Pimpri : दिल्लीतील स्फोटानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस अलर्ट मोडवर!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

 

पिंपरी – दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकजवळ झालेल्या स्फोटानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आली आहे. कोणताही धोका टाळण्यासाठी सोमवारी रात्रीपासूनच शहरभर ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली असून, प्रमुख चौक, मॉल्स, बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

राज्य गृहमंत्रालयाकडून उच्च सतर्कतेचा इशारा मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने तातडीने सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देऊन २४ तास गस्त, तपासणी आणि देखरेख वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, रहाटणी, वाकड, पिंपळे सौदागर आणि हिंजवडी या भागांमध्ये पोलिसांची गस्त आणि उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे.

महिला पोलिस अधिकारी आणि वाहतूक शाखेच्या संयुक्त पथकांकडून सार्वजनिक ठिकाणी, बसथांबे, बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वाहनांची, विशेषतः मालवाहू आणि दुचाकी-चारचाकी वाहने, कागदपत्रांसह तपासणी केली जात आहे. रात्रीच्या वेळी शहराच्या सीमांवर पोलिस फौजफाटा तैनात करून सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, व्यापारी, शाळा आणि महाविद्यालयांनीही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले असून, स्थानिक सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू अथवा हालचाली दिसल्यास पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

“सध्या शहरात कोणताही धोका नाही. मात्र दिल्लीतील घटनेनंतर खबरदारी म्हणून आम्ही शहरातील सुरक्षा वाढवली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.” — विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

The post Pimpri : दिल्लीतील स्फोटानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस अलर्ट मोडवर! appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!