अनेकांच्या पगारातून दर महिन्याला पीएफ (PF) कापला जातो, पण तो किती जमा झाला याची माहिती अनेकांना नसते. तसेच यासाठी वेबसाइटवर लॉगिन करा, पासवर्ड आठवा आणि पासबुक लोड होण्याची वाट पाहा हे सर्व कष्ट करावे लागतात. यामुळे अनेकजण याकडे कानाडोळा करतात.
पण आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने त्यांच्या लाखो सदस्यांसाठी एक अतिशय सोपी आणि धमाकेदार सुविधा सुरू केली आहे. आता तुम्हाला तुमचा पीएफ (PF) बॅलन्स तपासण्यासाठी इंटरनेटची गरज लागणार नाही. तसेच कोणत्याही लांबलचक वेबसाईट लॉगिन करा, पासवर्ड लक्षात ठेवा या भानगडीही करायची गरज लागणार नाही.
आता तुम्हाला फक्त एका मिस्ड कॉलवर किंवा SMS द्वारे तुमच्या पीएफ खात्याची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे. विशेष म्हणजे ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे.
ग्रामीण भागात किंवा ज्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नाही, त्यांच्यासाठी ही सुविधा नव संजीवनी ठरणार आहे. त्यामुळे आता गाव असो वा शहर, तुमचा पीएफ बॅलन्स चेक करणे पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे.
यासाठी तुमच्या पीएफ खात्याशी (UAN) लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून 9966044425 या नंबरवर फक्त एक मिस्ड कॉल द्या. दोन रिंग वाजल्यानंतर कॉल आपोआप कट होईल.
त्यानंतर काही मिनिटांतच तुम्हाला EPFO कडून एक SMS येईल, ज्यात तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम आणि शेवटी भरलेली रक्कम याची माहिती असेल.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा UAN क्रमांक सक्रिय असणे आवश्यक आहे. तो तुमच्या बँक खाते, आधार किंवा पॅनपैकी किमान एका कागदपत्राशी जोडलेला असावा.
जर तुम्हाला मिस्ड कॉल करायचा नसेल, तर SMS चा पर्याय उपलब्ध आहे. तुमच्या UAN सोबत नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवरून 7738299899 या नंबरवर एक SMS पाठवा. यासाठी EPFOHO UAN असे टाईप करुन पाठवा.
तुम्हाला जर माहिती इंग्रजीऐवजी मराठीत हवी असेल, तर तुम्ही EPFOHO UAN MAR असा SMS पाठवू शकता. हिंदीसाठी HIN, गुजरातीसाठी GUJ असे भाषेचे पहिले तीन अक्षर जोडा.
EPFO चा हा निर्णय लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. पीएफची माहिती मिळवणे आता एका क्लिकवर किंवा एका मिस्ड कॉलवर सोपे झाले आहे. त्यामुळे आता पीएफ चेक करण्यासाठी फक्त मोबाईल आवश्यक आहे.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.





















