PCMC Election : राष्ट्रवादी काँग्रेसची नवी ‘फौज’ निवडणुकीसाठी सज्ज! वाचा कोणाला कोणतं पद मिळालं?

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सोमवारी (दि. १० ) जाहीर केली. यामध्ये १९१ जणांना विविध पदांवर संधी देण्यात आली आहे. सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना यामध्ये सामावून घेत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या कार्यकारिणीमध्ये शहराध्यक्ष म्हणून योगेश बहल यांचे पद तसेच ठेवण्यात आले आहे. तर मुख्य समन्वयक म्हणून माजी आमदार विलास लांडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

मुख्य प्रवक्तेपदी अजित गव्हाणे, मुख्य संघटक भाऊसाहेब भोईर, नाना काटे यांची निवड झाली आहे. याशिवाय कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, मोरेश्‍वर भोंडवे, संतोष बारणे, शाम लांडे, फजल शेख, उल्हास शेट्टी, राहुल भोसले, विक्रांत लांडे, तानाजी खाडे यांची निवड झाली आहे. महिलाध्यक्षपदी कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, युवती अध्यक्ष वर्षा जगताप यांची निवड झाली आहे.

तर खजिनदारपदी दिपक साकोरे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष कैलास बारणे, पिंपरी राजू मिसाळ व भोसरी विधानसभा अध्यक्षपदी पंकज भालेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विधानसभा संघटक, महिला विधानसभा संघटिका, शहर कार्यकारिणी सदस्यपदी ६, शहर उपाध्यक्षपदी ४३, शहर सरचिटणीसपदी ३४, शहर चिटणीसपदी २३ जणांची नियुक्ती केली आहे.

The post PCMC Election : राष्ट्रवादी काँग्रेसची नवी ‘फौज’ निवडणुकीसाठी सज्ज! वाचा कोणाला कोणतं पद मिळालं? appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!