Pakistani Warship : समुद्रात पाकची मोठी चाल; बंगालच्या उपसागरात बांगलादेशाच्या मदतीने टाकला डाव, भारताविरोधात मोठे कारस्थान?

Pakistani Warship : समुद्रात पाकची मोठी चाल; बंगालच्या उपसागरात बांगलादेशाच्या मदतीने टाकला डाव, भारताविरोधात मोठे कारस्थान?
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

बांगलादेशात सरकार उलथल्यानंतर मोहम्मद युनूस सरकार हे धार्मिक कट्टरतावाद्यांचे बाहुले ठरले आहेत. युनूस पूर्णपणे या धार्मिक कट्टरतावाद्यांच्या प्रभावाखाली आहेत. युनूसवर चीन आणि पाकिस्तानचा मोठा प्रभाव आहे. त्यातूनच आता पाकिस्तानची युद्धनौकेने 54 वर्षानंतर पहिल्यांदाच चटगाव बंदरात नांगर टाकला आहे. पाकिस्तानच्या नौदलाची PNS सैफ सध्या चटगाव बंदरात दाखल झाली आहे. ही युद्धनौका चीनमध्ये तयार झाली आहे. F-22पी झुल्फिकार मिसाईल त्यावर बसविण्यात आली आहे. 4 दिवसांसाठी ही युद्धनौका येथे असेल. भारताच्या मदतीने 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला. पाकिस्तानने बंगाली मुसलमानांवर मोठे अत्याचार केले होते. पण आता शत्रू मित्र झाले आहेत. भारताविरोधात हे मोठे कारस्थान असल्याचा सांगण्यात येत आहे.

बांगलादेश नौदलाने त्यांच्या फेसबुकवर पोस्ट करत बंदरात पाक युद्धनौका दाखल झाल्याची माहिती दिली आहे. कॅप्टन शुजात अब्बास राजा हे या युद्धनौकेचे नेतृत्व करत आहे. चटगाव येथील नौदलाने त्यांचे स्वागत केले. पाकिस्तानी अधिकारी, नौदलाचे अधिकारी आणि दुतावासातील अधिकाऱ्यांचे मोठे स्वागत करण्यात आले. BNS शादीनोताने पाहुण्यांचे स्वागत केले.

भारताविरोधात मोठे करस्थान?

भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यापासून पाकचा जळपळाट सुरू आहे. भारताला कुटनीतीत अडकवण्यासाठी पाकचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी तुर्कस्थान, अमेरिका, रशिया आणि चीनसोबत पाक संबंध दृढ करण्यावर भर देत आहे. त्याचवेळी श्रीलंका, मालदीव, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये पाक लष्कराचे अधिकारी सातत्याने दिसत आहेत. एका वृत्तानुसार, बांगलादेश शेजारी मान्यमारच्या दक्षिण भागात नवीन देश तयार करण्याचा अमेरिकेचा डाव सुरू असल्याचा दावा आहे. त्यासाठी पाकिस्तानी लष्कर मदत करणार असल्याचे सांगितले जाते. भारताविरोधात अरब, हिंद आणि बंगालच्या उपसागरात अमेरिकेची मदत मिळवण्यासाठी पाकचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून ही युद्धनौका चटगाव बंदरात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

चीनचा पण भारताला इशारा

PNS सैफची निर्मिती चीनमध्ये करण्यात आली. 2010 मध्ये पाकिस्तानी नौदलात ती दाखल झाली. पाकिस्तानमधील जवळपास 70 टक्क्यांहून अधिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि इतर लष्करी साहित्य हे चीनमधून येते. भारताविरोधात दहशतवादी त्याचा वापर करतात. आता सहकार्य वाढवण्यासाठी चीनचाही बांगलादेशावर दबाव असल्याचा दावा करण्यात येत आहे. चीन भारताविरोधात सातत्याने दबावाचे राजकारण करत असल्याचे समोर येत आहे. भारतीय सरकारने या सर्व घडामोडींवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या हालचालींवर भारतीय नौदलाचे बारकाईने लक्ष आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!