Pakistan : पाकमध्ये गेलेल्या शीख महिलेचे धर्मांतर, मुस्लिम व्यक्तीशी निकाह

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

लाहोर – पाकिस्तानमध्ये धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या शीख महिलेचे धर्मांतर करण्यात आले असून सोशल मीडियावरून परिचय झालेल्या स्थानिक मुस्लिम व्यक्तीशी तिचा निकाह झाल्याचे लाहोर पोलिसांनी सांगितले. ही महिला बेपत्ता झाल्यानंतर भारतातील पंजाब प्रांतातील पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता.

सरबजीत कौर असे या ४८ वर्षीय महिलेचे नाव असून गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त अन्य २ हजार भारतीय भाविकांसमवेत त्या पाकिस्तानात गेल्या होत्या. हे यात्रेकरू १३ नोव्हेंबर रोजी भारतात परतले. मात्र कौर बेपत्ता होत्या.

ज्या दिवशी त्या पाकिस्तानात गेल्या, त्याच्या दुसऱ्याच दिवशी, ४ नोव्हेंबर रोजी लाहोरपासून ५० किलोमीटरवरील शेखुपुरा जिल्ह्यातील नासिर हुसेनशी त्यांचा निकाह झाला. त्यांनी स्वतःच्या मर्जीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. कौर आणि नासिर हुसेन यांचा शोध घेतला जात असल्याचे लाहोर पोलिसांनी सांगितले.

निकाहनाम्यानुसार आता कौर यांचे नाव नूर असे करण्यात आले आहे. शेखुपुरातील फारुखाबाद भागातील रहिवासी नासिर हुसेनशी निकाह झाल्याचे निकाहनाम्यात म्हटले आहे. कौर घटस्फोटित असून त्यांचे पती अनेक वर्षांपासून विदेशात रहात असल्याचे सागण्यात येत होते. कौर यांना दोन मुले देखील आहेत.

आपण हुसेनला ९ वर्षांपासून सोशल मीडियावरून ओळखत असून त्याच्याशी विवाह करण्याची आपली इच्छा असल्याचे कौर यांनी सोशल मीडियावरच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. आपण भारतातून कपड्यांशिवाय काहीही आणलेले नाही. आपले कोणीही अपहरण केलेले नसून आनंदाने नासिर हुसेनशी विवाह केल्याचेही कौर यांनी म्हटले आहे.

सरबजीत कौर या भारतातील पंजाबमधील कपुरथळा जिल्ह्यातल्या अमनीपुर गावच्या रहिवासी आहेत. तेथील पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कौर यांनी जानेवारी २०२४ मध्येच पासपोर्ट मिळवला होता. कौर यांच्याविरोधात कपुरथळा शहरात २ आणि भटिंडा येथे १ अशी फसवणूकीची ३ प्रकरणे दाखल असल्याचे अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

२०१८ मध्ये, होशियारपूर जिल्ह्यातील किरण बाला पाकिस्तानला जाणाऱ्या एका जथेचा भाग होती आणि तिथून बेपत्ता झाली. नंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि एका पाकिस्तानी पुरुषाशी लग्न केले, त्यानंतर तिचे नाव आमना बीबी असे ठेवण्यात आले.ती तिच्या तीन मुलांना मागे सोडून गेली होती. तिच्या पतीचे २०१३ मध्ये निधन झाले होते.

पाक सरकारने सुरक्षा पुरवावी…
हुसेनबरोबर निकाह झाल्याच्या काही तासांनी काही लोक हुसेनच्या घरात घुसली आणि दोघांबरोबर गैरवर्तन केले. या लोकांनी आपल्याला बळजबरीने बरोबर नेण्याचा प्रयत्न केला. तसेच खोटी प्रकरणे दाखल करण्याची धमकीही दिली असल्याचे कौर यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे. पाकिस्तान सरकारने आपल्याला आणि पतीला सुरक्षा पुरवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

The post Pakistan : पाकमध्ये गेलेल्या शीख महिलेचे धर्मांतर, मुस्लिम व्यक्तीशी निकाह appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!