
Prabhas : पुष्पा द राईज आणि पुष्पा द रुल सारखे अॅक्शनपट चित्रपट तयार करणारे मैत्री मूव्ही मेकर्स त्यांचा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या बहुप्रतिक्षित आगामी चित्रपटांपैकी एक असणार आहे. या चित्रपटाचे नाव फौजी असून, नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे.
हा चित्रपट घोषणा केल्यापासूनच चर्चेत आहे, या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभासला आझाद हिंद सेनेचा सैनिक म्हणून पाहण्याची संधी मिळणार आहे. हा चित्रपट ऐतिहासिक घटनांचे काल्पनिक चित्रण असणार आहे. या चित्रपटामुळे सुपरस्टार प्रभास आणि सीता रामम दिग्दर्शक हनु राघवपुडी ही दिग्दर्शक अभिनेत्याची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे.
निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये प्रभास भयंकर अवतारात दिसत आहे. महत्वाचे म्हणजे हा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच दिग्दर्शक हनु राघवपुडी यांनी चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले आहे.
फौजीचे जग खूप विस्तृत असून, हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित केला जाईल, असे दिग्दर्शक हनु राघवपुडी यांनी स्पष्ट केले आहे. ‘फौजी’ हा ‘बाहुबली’ नंतर प्रभाससाठी पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी मिळणारा चित्रपट ठरणार असल्याचे चित्रपट समीक्षकांचे म्हणणे आहे. मैत्री मूव्ही मेकर्सचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात आहे. “द ब्रेव्हेस्ट स्टोरी ऑफ अ सोल्जर” ही टॅगलाइन पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे प्रभासच्या चाहत्यांना फौजी चित्रपटाची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा : “बिहारमध्ये १० हजार रुपयांच्या योजनेमुळे फायदा, निवडणूकीआधी अधिकृतपणे पैसे वाटणे…”; शरद पवारांची प्रतिक्रिया
The post प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! बिग बजेट फौजी चित्रपटातील फर्स्ट लूक रिव्हील appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











