NZ vs WI 4th T20i : न्यूझीलंड मालिका विजयसाठी सज्ज, वेस्ट इंडिज रोखणार? चौथा सामना केव्हा?

NZ vs WI 4th T20i : न्यूझीलंड मालिका विजयसाठी सज्ज, वेस्ट इंडिज रोखणार? चौथा सामना केव्हा?
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. विंडीजने या दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. विंडीजने टी 20i मालिकेतील पहिला सामना जिंकला. विंडीजने यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने सलग 2 सामने जिंकले. न्यूझीलंडने यासह पहिल्या पराभवाची परतफेड करत मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. त्यामुळे आता न्यूझीलंडकडे चौथ्या सामन्यात सलग आणि एकूण तिसरा विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला विंडीजसाठी मालिकेच्या दृष्टीने हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे या सामन्याच चाहत्यांना चुरस पाहायला मिळणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामना केव्हा?

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामना सोमवारी 10 नोव्हेंबरला होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामना नेल्सनमधील सेक्सटन ओव्हल येथे होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार पहाटे पावणे 6 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 5 वाजून 15 मिनिटींनी टॉस होईल.

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपद्वारे हा सामना मोबाईलवर लाईव्ह पाहायला मिळेल.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!