N.Chandrababu Naidu : देशाचा पंतप्रधान मोदींवर विश्वास; चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले मत

N.Chandrababu Naidu
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

हैदराबाद : बिहारमधील मतमोजणीच्या ट्रेण्डवरुन असे दिसून येते की, मतदारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. जनतेचा पंतप्रधान मोदींवर इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त भरवसा आहे, असे प्रतिपादन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. बिहार निवडणुकीतील मतमोजणीचे कल हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या वाट्याला जात आहेत. त्यामुळे देशभर आनंदाचे वातावरण आहे, असेही नायडू म्हणाले.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, बिहारमध्ये इतिहास लिहिला जात आहे. जनता पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर विश्वास ठेवते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश आणि बिहार पुढे जात आहे. तेजस्वी यादव आणि त्यांच्या आघाडीतील बहुतांश पक्षांना बिहारच्या लोकांनी साफ नाकारले आहे. दिल्लीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले की, जनतेच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की यावेळीही एनडीएलाच जनादेश मिळेल. एनडीए पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. नितीश कुमार, चिराग पासवान, जीतन राम मांझी, उपेंद्र कुशवाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, या सर्व नेत्यांनी खूप मेहनत घेतली आहे.

तेजस्वी यादव यांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना त्यागी म्हणाले, पराभवानंतर ते आता निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर दोषारोप करत आहेत. त्यांनी आरजेडी नेते सुनील कुमार सिंह यांच्या विधानालाही उत्तर देताना म्हटले आहे की, त्यांना हे माहित असले पाहिजे की नेपाळमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची घरे लुटण्यात आली आणि जाळण्यात आली.

गयामध्ये एनडीएच्या आघाडीबद्दल केंद्रीय मंत्री आणि एचएएम (धर्मनिरपेक्ष) संरक्षक जीतन राम मांझी म्हणाले, हा निकाल अनपेक्षित नाही. आम्ही आधीच भाकित केले होते की एनडीए प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल आणि नितीश कुमार मुख्यमंत्री होतील. दिल्लीत भाजपचे प्रवक्ते सय्यद शाहनवाज हुसेन यांनीही दावा केला, निकाल स्पष्ट आहेत. बिहारच्या लोकांनी पंतप्रधान मोदी, नितीश कुमार आणि एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या २० वर्षातील सरकारच्या कामाच्या आधारे लोकांनी मतदान केले आहे.

आता पश्चिम बंगालमध्ये विजयी व्हायचेय…
बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीबाबत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, एकीकडे लालू प्रसाद यादव, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि आक्रमक तेजस्वी यादव यांचे नेतृत्व आहे. हे नेतृत्व तुरुंगवास आणि जामीन, भ्रष्टाचार, जंगलराज आणि लूट यांचे प्रतीक आहेत. बिहारच्या लोकांनी शांतता आणि सौहार्दासाठी मतदान केले आहे. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांचे नेतृत्व आहे. तरुणांनी त्यांचे काम पाहिले नसेल, परंतु ज्येष्ठांनी त्यांचे काम पाहिले आहे आणि हा विजय त्यांचा आहे. या निकालांनंतर भाजपाचा आता पश्चिम बंगाल विधानसभा जिंकायची आहे, हे कुणीही विसरता कामा नये. तेथूनही रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणे आवश्यक आहे.

The post N.Chandrababu Naidu : देशाचा पंतप्रधान मोदींवर विश्वास; चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले मत appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!