Mulshi Politics : मुळशीत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भूकंप; विविध पक्षांचे पदाधिकारी राष्ट्रवादीत सामील

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पिरंगुट – मुळशी तालुक्यातील विविध पक्षांतील अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले.आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली पिरंगुट आणि भुकूम मधील ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच अन्य कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला.

शिवाजीनगर येथे पक्ष कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यास आमदार शंकर मांडेकर, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, शांताराम इंगवले, रविंद्र कंधारे, माजी खासदार विदुरा नवले यांचे पूत्र ज्ञानेश नवले आदी मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पिरंगुटचे माजी उपसरपंच रामदास पवळे, माजी सरपंच रमेश पवळे, मोहन निकटे, माजी उपसरपंच अमर निकटे, अमित निकटे, माजी सदस्य भानुदास गोळे, तुळजा भवानी ट्रस्टचे माजी अध्यक्ष उमेश पवळे, अविनाश राजिवडे यांचा प्रवेश झाला.

भुकूमच्या सरपंच सुवर्णा आंग्रे, माजी सरपंच व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवती अध्यक्षा गौरी भरतवंश, माजी सरपंच रेखा वाघ, मयुरी आमले, सुवर्णा पानसरे, उपसरपंच सचिन आंग्रे, माजी उपसरपंच सचिन हागवणे, निलेश ननावरे, अंकुश खाटपे, राजेंद्र आंग्रे, ज्ञानेश्वर आंग्रे, बावधनचे सदस्य आझाद दगडे, गोविंद आंग्रे, रामदास आंग्रे, रोहिदास आमले, निलेश मारणे आदींनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले.

“नव्या सहकार्‍यांच्या सहभागामुळे पक्षात नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकजुटीने, योजनाबद्ध पद्धतीने आणि विकासाभिमुख दृष्टिकोनातून काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मजबूत संघटनेच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षांची पूर्तता आणि विकासाची गती वाढवा.”
-अजित पवार, उपमुख्यमंत्री

The post Mulshi Politics : मुळशीत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भूकंप; विविध पक्षांचे पदाधिकारी राष्ट्रवादीत सामील appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!