
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र महायुतीत मोठी फूट पडली असून, जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांपैकी येवला, मनमाड आणि नांदगाव या तीन नगरपरिषदांच्या निवडणुकीत अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांनी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत युती करण्यास ठाम नकार दिला आहे. भाजपला दोन्ही गटांमध्ये समन्वय साधणे कठीण जात असल्याचे दिसत आहे.
समीर भुजबळ यांची ठाम भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते समीर भुजबळ यांनी १० नोव्हेंबर रोजी भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी पक्षाची रणनीती स्पष्ट करताना सांगितले की, येवल्यात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे. शिंदे गटाची तिथे फारशी ताकद नसून ते प्रतिस्पर्धीच आहेत, त्यामुळे युती शक्य नाही. मनमाड आणि नांदगावमध्येही शिंदे गट विरोधक असल्याने तिथेही युती होणार नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. मात्र, भाजपसोबत युतीचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिले.
गिरीश महाजन यांचा समेटाचा प्रयत्न
भाजप नेते गिरीश महाजन यांनी महायुती एकत्र लढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि समीर भुजबळ दोघेही त्यांना भेटले. मात्र, कांदे आणि भुजबळ यांच्यातील जुन्या वैरामुळे ते वेगळे लढतील, असे महाजन यांनी मान्य केले. जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदा एकत्र लढवण्याचा प्रयत्न असला तरी तीन ठिकाणी फूट निश्चित झाल्याचे चित्र आहे.
तीन नगरपरिषदांमध्ये तिहेरी लढत अपरिहार्य
या घडामोडींमुळे येवला, मनमाड आणि नांदगावमध्ये महायुतीची एकजूट तुटली आहे. राष्ट्रवादी (अजित गट) स्वतंत्रपणे, तर शिंदे गट आणि भाजप वेगवेगळ्या रणनीतीने लढण्याची शक्यता आहे. यामुळे तिहेरी लढत होऊन महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या तीन नगरपरिषदांमध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
The post Mahayuti Politics : महायुतीमध्ये पहिली फुट! ‘या’ नेत्याने युतीसंदर्भात केली मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











