
नोकरी शोधताय? महाराष्ट्र शासनाच्या उपवनसंरक्षक, व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव विभागांतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. वनविभागात कार्य करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर तसेच इतर पदे भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता पदानुसार बदलते. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यानुसार पात्रतेची माहिती जाहिरातीत तपासावी. निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन साधारण 18,000 रुपये दिले जाणार आहे. (काही पदांसाठी वेतन यापेक्षा थोडे फरक असू शकते.) अर्ज प्रक्रिया ऑनलाइन (ई-मेल) किंवा ऑफलाइन पद्धतीने स्वीकारली जाणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज निर्धारित नमुन्यात पूर्ण करून पाठवावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2025 आहे, त्यामुळे अर्ज वेळेत पाठवणे महत्त्वाचे आहे.
ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता:
वनसंरक्षक कार्यालय, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, अकोट.
ऑनलाइन अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता:
dcf.akot@yahoo.com
सर्व आवश्यक माहिती, पात्रता, अटी आणि कागदपत्रांची यादी जाणून घेण्यासाठी अधिकृत PDF जाहिरात अवश्य वाचा. हे पद मर्यादित असल्यामुळे योग्य उमेदवारांनी संधी हातची जाऊ न देता त्वरित अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











