Maharashtra Live Breaking News : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना डिस्चार्ज

Maharashtra Live Breaking News : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना डिस्चार्ज
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कामाला लागली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालनाच्या दौऱ्यावर असून निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ता मेळावा होणार आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह शेकडो जण आज शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात मोठे खुलासे होताना दिसत आहेत. 13 जणांना ताब्यात पोलिसांनी घेतले असून चाैकशी सुरू आहे. दिल्लीच्या स्फोटाचे कनेक्शन थेट जम्मू काश्मीरच्या पुलवामापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात आज काही मोठे खुलासे होऊ शकतात. आज बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुढील उपचार त्यांच्यावर घरी सुरू राहणार आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Source

Join Our WhatsApp Group!