Local elections : स्थानिक ‘रणसंग्राम’! काँग्रेस पक्षाचा पहिला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Principal Dr. Deepak Jaiswal : स्थानिक निवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून, सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर राजकीय चित्र फार वेगळे आहे. त्यामुळे राजकीय युती कोणासोबत करायची याचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपविण्यात आला आहे.

स्थानिक निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील नगरपरिषदा आणि पंचायत समितीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडणार आहे. त्यानुसार १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख असली तरी अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

अशातच नवापूर नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस थेट नगराध्यक्ष पदाचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. नवापूर नगरपालिका निवडणूक रंगतदार होणार असून, उमेदावारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांंनी रणनितीची आखणीला सुरूवात केली आहे.

नुकत्याच नवापूर नगरपालिकेसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. नवापूर नगरपालिका निवडणुकीसाठी प्राचार्य डॉ. दीपक जयस्वाल यांच्या नावाची पक्षाकडून घोषणा करण्यात आली.  लवकरच काँग्रेस पक्ष नगरसेवकांची यादी जाहीर करणार आहे. यामुळे अनेक इच्छुकांमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नवापूर नगरपालिकेसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा होती. अखेर प्राचार्य डॉ. दीपक जयस्वाल यांना नगराध्यक्ष पदावर शिक्कामोर्तेब झाल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नवापूर पालिकेवर बहुतांश काँग्रेस पक्षाची सत्ता राहिली आहे.

तरी उत्तर महाराष्ट्रात नवापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला अबाधित राहिला आहे.  स्थानिक निवडणुकीसाठी आमदार शिरीषकुमार नाईक पालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता कशी स्थापन होईल, या अनुषंगाने रणनीती आखत आहेत.

हेही वाचा : Actress Payal Ghosh: लाल किल्ला बॉम्बस्फोटात पायल घोषची जिवलग मैत्रीण ठार; “ती माझं कुटुंब होती, एक आठवड्यापूर्वीच बोलले होते”… अभिनेत्री भावनिक

The post Local elections : स्थानिक ‘रणसंग्राम’! काँग्रेस पक्षाचा पहिला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!