
Ladki Bahini Yojana Online Apply Registration Link @ ladakibahin.maharashtra.gov.in
राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातून २५ जुलैपर्यंत तब्बल १४ लाख ६५ हजार ८७६ अर्ज सादर झाले आहेत. त्यापैकी १४ लाख ४१ हजार ७९८ अर्ज पात्र ठरले आहेत, तर २४ हजार ७८ अर्ज अपात्र ठरले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तर लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत भरण्याचे आवाहन केले आहे.

राज्य सरकार दरमहा १,५०० रुपयांचे अनुदान पात्र महिलांच्या खात्यात जमा करत आहे. या योजनेचा लाभ नियमितपणे मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. ई-केवायसी म्हणजे लाभार्थ्यांच्या आधार व बँक खात्याशी संबंधित माहितीची पडताळणी. ही प्रक्रिया पूर्ण नसल्यास अनुदानाची पुढील रक्कम तात्पुरती स्थगित राहू शकते. लाभार्थ्यांनी संबंधित अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, महिला बालविकास कार्यालय किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) येथे जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या लाभार्थ्यांनी निर्धारित मुदतीता ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांच्या खात्यातील अनुदान रक्कम तात्पुरती स्थगित राहू शकते, असे महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी कळवले आहे.
या योजनेत ठाणे जिल्ह्यातील ९,१५,६९६ महिलांनी ऑनलाइन अर्जी सादर केले आहे. त्यापैकी ९,०२,६११ अर्ज पात्र ठरले आहेत. तसेच विशेष विकसित ‘नारी शक्ती दूत’ अॅपच्या माध्यमातून ५,५०,१८० अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यातील ५,३९,१८७पात्र, तर १०,९९३ अपात्र ठरले आहेत…
ladki bahin maharashtra gov in 2024 राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. या योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेताना योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच आता आपण ऑनलाईन अर्ज नवीन पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in/ द्वारे सुद्धा करू शकता. खाली आणि या पोर्टल वर अर्ज सादर करण्याची नवीन लिंक दिलेली आहे. या लिंक द्वारे आपण सरळ अर्ज दाखल करू शकता.
लाडकी बहीण हा नवीन हेल्पलाइन नंबर सुरु! – Ladki Bahin Helpline Number
नवीन पोर्टल द्वारे अर्ज करण्याची लिंक
Nari Shakti Doot App Available
नारीशक्ती दूत ॲपद्वारे लाडकी बहीणसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, पूर्ण स्टेप्स
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. त्यासाठी २१ ते ६० वयोगटातील महिला (वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा) या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्यास आज पासून(सोमवारी) प्रारंभ होणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातून लाखो भगिनी अर्ज सूरू होण्याची वाट बघत आहे. अजून अर्जाची लिंक सुरू झाली नाही. लिंक आज उपलब्ध होणे अपेक्षित आहे. उपलब्ध झाली की लगेच महाभरती वर उपलब्ध करून देवू.एकट्या सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 14 लाख महिला योजनेच्या लाभार्थी होऊ शकतील अशी स्थिती आहे. महाराष्ट्रतील लाभार्थी सर्व महिलांना योजनेच्या लाभासाठी अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे. लाभार्थी महिलांना 15 दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा- इ-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आज पासून (सोमवार 1 जुलै 2024 पासून) अर्ज करता येणार असून त्याचे संकेतस्थळ लिंक महाभरती वर आम्ही लाभार्थींना लवकरच थोड्या वेळात उपलब्ध करून दिले जाईल. प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात. त्यांच्याकडील अर्ज आमच्याकडे आल्यावर यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करू. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थींची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ मिळेल.
Online Application Form Ladki Bahini Yojana Maharashtra
विनामूल्य राहणार अर्ज भरण्याची प्रक्रिया, कसा कराल अर्ज जाणून घेऊया..
Registration Process, Application form submission details are given below. Eligible candidates can apply as per the instructions given below. Link will be available after some time on www.MahaBharti.in
अर्ज भरण्याची सुविधा – अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक थोडयाच वेळात आम्ही अपडेट करु, तरी www.MahaBharti.in ला भेट देत रहा किंवा या लिंक वरुन महाभरती ॲप डाऊनलोड करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात. हि लिंक थोड्याच वेळात आम्ही महाभरती वर अपडेट करू. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत/ वॉर्ड/ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, सेतू सुविधा केंद्रांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य राहील, असे आदेशात शासन निर्णयात नमूद आहे.
Maharashtra Ladli Bahin Yojana Details & Registration In Marathi
PDF अर्जाचा नमुना डाउनलोड करा
अर्ज भरण्याची प्रक्रिया – Ladki Bahini Yojana Schedule
– अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै
– अर्ज करण्याची शेवट तारीख : १५ जुलै
– प्रारूप निवड यादी प्रकाशित : १६ ते २० जुलै
– प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : २१ ते ३० जुलै
– लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : १ ऑगस्ट
– लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून
Ladki Bahini Yojana Eligibility Criteria
कोणत्या महिला असणार पात्र?
– महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
– विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
– वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा
– अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक
– अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे
– अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल
– ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.
माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रुपये कोणाला मिळणार ? त्याचा फॉर्म कसा भरायचा
ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक
– ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा
– आधार कार्ड आवश्यक
– राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
– बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
– पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
– योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
– अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक
-उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका,
-पासपोर्ट साईज फोटो
-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म
The post ‘लाडकी बहीण’साठी आले लाखो अर्ज, KYC आणि अर्ज लिंक बद्दल अपडेट! – Ladakibahin.maharashtra.gov.in – Ladki Bahini Yojana Online Apply appeared first on MahaBharti.in.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











