
विश्वासाच्या पायावरच कोणतंही नातं उभं असतं मग ते मित्र-मैत्रीणीचं असो, भावा-बहिणीचं किंवा पती-पत्नीचा एकदा का विश्वास मोडला तर नात्याला तडा जायला क्षणभराचाही वेळ लागत नाही. प्रेमात पडलेला माणूस काहीही करू शकतो असं म्हणतात, पण हे प्रेम दुसऱ्यासाठी जीवघेणं ठरलं तर मग खूप पंचाईत होते आणि जीवन उद्ध्वस्त होतं. असंच काहीसं जालन्यातल्या सोमठाणा गावातही घडलं. पती-पत्नीचा सुखाचा संसार सुरू होता, मात्र दीराच्या रुपाने त्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आणि हसता-खेळता संसार क्षणात मोडला. वहिनीशी प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंधातून एका इसमाने त्याच्याच सख्ख्या भावाची हत्या केली (crime) आणि त्या मृतदेह धरणात फेकून दिला. धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये मृत व्यक्तीच्या पत्नीनेही दीराची साथ दिली आणि खुनात मदत करत मृतदेहाची विल्हेवाट लावून टाकली.
अनैतिक प्रेम संबंध मध्ये अडथळा येत असल्याने मागच्या महिन्यात 15 ऑक्टोबर रोजी डोक्यात कुऱ्हाडीने वार करून इसमाचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करून मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह गोणीत भरून तलावात फेकला होता. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या गुन्ह्याची उकल केली असून बदनापूर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या भावाला आणि पत्नीला अटक केली.
नेमकं काय घडलं ?
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा गावातून ही धक्कादायक घटना समोर आली. प्रेम प्रकरणामधून सख्या भावानेच आपल्या वहिनीच्या मदतीने मोठ्या भावाचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर राम तायडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या भावाला आणि पत्नीला अटक केली असून त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. तेव्हा मृत व्यक्तीचा लहान भाऊ ज्ञानेश्वर तायडे आणि मृताची पत्नी मनीषा परमेश्वर तायडे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अनैतिक प्रेम संबंध असल्याच समोर आला. मात्र परमेश्वर याला हे समजलं आणि त्या दोघांच्या प्रेमसंबंधात त्याचा अडथळा येऊ लागला.
म्हणूनच दोघांनी त्याला मार्गातून हटवण्याचा कट रचला. अखेर ज्ञानेश्वर आणि मनीषा यांनी गेल्या महिन्यात 15 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री परमेश्वरच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत त्याचा निर्घृण खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावून या खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह एका प्लास्टिकच्या गोणीत भरला आणि गावालगत असलेल्या वाल्हा येथील धरणात आणून फेकला. मात्र याप्रकरणी मृत व्यक्तीच्या वडिलांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी तपास सुरू करून गुन्हा उघडकीस आणला. त्यानंतर बदनापूर पोलीस ठाण्यात पत्नी आणि लहान भावावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











