IPL 2026 CSK Captain : संजू, धोनी की ऋतुराज? सीएसकेचा कॅप्टन कोण? मॅनेजमेंटचा मोठा निर्णय

IPL 2026 CSK Captain : संजू, धोनी की ऋतुराज? सीएसकेचा कॅप्टन कोण? मॅनेजमेंटचा मोठा निर्णय
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी एकूण 10 फ्रँचायजींनी करार मुक्त केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. रिटेन्शनआधीच काही संघांनी संमतीने खेळाडूंना ट्रेड केलं होतं. तर त्यानंतर रिटेन्शनमधून फ्रँचायजींनी काही खेळाडूंना नारळ दिली आहे. रवींद्र जडेजा-संजू सॅमसन यांची अदलाबदल ही आगामी मोसमासाठीची सर्वात मोठी डील ठरली. राजस्थान रॉयल्सने ऑलराउंडर रवींद्र जडेजा या आपल्या जुन्या भिडूला आपल्या गोटात घेतलं. तर राजस्थानसाठी दशकापेक्षा जास्त काळ खेळणाऱ्या संजू सॅमसनची ट्रेडद्वारे चेन्नई सुपर किंग्समध्ये एन्ट्री झाली आहे.

संजू सॅमसनची सीएसकेमध्ये एन्ट्री झाल्याने आता या टीमचा कॅप्टन कोण असणार? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात होता. मात्र फ्रँचायजीने रिटेन्शननंतर कर्णधाराबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. पुणेकर ऋतुराज गायकवाड हाच नेतृत्व करणार असल्याचं सीएसेकेने जाहीर केलं आहे.सीएसकेने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट करत ही घोषणा केली आहे.

Source

Join Our WhatsApp Group!