
सध्या क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी सर्व संघानी 15 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची नावे जाहीर केली. यानंतर यंदाच्या सिझनसाठी खेळाडूंची मिनी ऑक्शन कधी पार पडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती.
अखेर मिनी ऑक्शनची अधिकृत तारीख समोर आली आहे.आयपीएलने रिटेन्शननंतर अवघ्या काही तासांनीच मिनी ऑक्शची तारीख जाहीर केली आहे. आयपीएलने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे. चला तर मग कधी आणि कुठे पार पडणार हे मिनी ऑक्शन जाणून घेऊयात..
NEWS
The player retention window for #TATAIPL 2026 season closed on November 15, 2025, with all 10 franchises confirming their retained players ahead of the auction.
The #TATAIPLAuction will take place on 16th December at the Etihad Arena in Abu Dhabi.
More details
…
— IndianPremierLeague (@IPL) November 15, 2025
मिनी ऑक्शन कधी आणि कुठे?
प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, आजपासून बरोबर 1 महिन्यानंतर 16 डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे. यंदाही विदेशातच मिनी ऑक्शन होणार आहे. अबुधाबीतील एतिहाद एरीनामध्ये हे ऑक्शन पार पडणार आहे.
मिनी ऑक्शनमधून किती खेळाडूंची खरेदी होणार?
एकूण 10 संघांनी रिटेन्शमधून 173 खेळाडूंना आपल्या सोबत कायम ठेवलं. यात 49 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर मिनी ऑक्शनमधून फक्त 77 खेळाडूंनाच खरेदी करता येणार आहे. त्यासाठी एकूण 237 कोटी 55 लाख रुपये इतकी रक्कम उपलब्ध आहे. प्रत्येक संघ आपल्या गोटात जास्तीत जास्त 25 खेळाडू ठेवू शकतात.
कोणत्या फ्रँचायजीकडे सर्वाधिक रक्कम शिल्लक?
दरम्यान तब्बल 3 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे यावर्षी सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. त्यांच्याकडे 64 कोटी 30 लाख इतकी रक्कम उपलब्ध आहे. केकेआर जास्तीत जास्त 13 खेळाडू मिनी ऑक्शनद्वारे घेऊ शकते. त्यात 6 विदेशी खेळाडू घेणं बंधनकारक असणार आहे. यानंतर सर्वाधिक रक्कम चेन्नई सुपर किंग्सकडे आहे. त्यांच्याकडे 43 कोटी 40 लाख रुपये आहेत. यामधून ते जास्तीत जास्त 9 खेळाडू आपल्या ताफ्यात घेऊ शकतात.
The post IPL 2026 Auction Date : मिनी ऑक्शनची तारीख ठरली ! कधी आणि कुठे पार पडणार? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.

NEWS
…









