IPL 2026 Auction Date : अधिकृत शिक्कामोर्तब, मिनी ऑक्शनची तारीख फिक्स, कुठे-कधी होणार? जाणून घ्या

IPL 2026 Auction Date : अधिकृत शिक्कामोर्तब, मिनी ऑक्शनची तारीख फिक्स, कुठे-कधी होणार? जाणून घ्या
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) एकूण 10 फ्रँचायजींनी 15 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्यासह गेली 12 वर्ष असणाऱ्या मॅचविनर ऑलराउंडर आंद्रे रसेल याला रिलीज केलं. तर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्यासाठी ट्रेड झालं. राजस्थानने संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजाला घेतलं. तर चेन्नईने संजू सॅमसन याल्या आपल्या संघात स्थान दिलं. तसेच इतर संघांनीही ठरल्यानुसार काही खेळाडूंना नारळ दिला. तसेच अनेक खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांना आपल्यासह कायम ठेवलं.

रिटेन्शननंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. मिनी ऑक्शन कधी आणि कुठे होणार? हा गेल्या अनेक आठवड्यांपासून सातत्याने प्रश्न विचारला जात आहे. मात्र अखेर या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. आयपीएलने रिटेन्शननंतर अवघ्या काही तासांनीच मिनी ऑक्शची तारीख जाहीर केली आहे. आयपीएलने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!