
बांग्लादेशातील यूनुस सरकार भारतीय सीमेजवळ मोठ्या प्रमाणात एअरबेसचा विस्तार करत आहे. या विस्तारातंर्गत लालमोनिरहाट एअर बेसवर नवीन हँगर, जेट पार्किंग आणि रडार सिस्टिम तयार केली जात आहे. यूनुस सरकार आणि भारताचे कूटनितीक संबंध बिघडलेले असताना बांग्लादेशकडून हा विस्तार कार्यक्रम सुरु आहे. नॉर्थईस्ट पोस्टनुसार, भारताने मनाई करुनही बांग्लादेश सरकार लालमोनिरहाट एअर बेसचा विस्तार करत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बंगाल आणि असम बॉर्डर जवळ 3 नव्या ठिकाणी सैन्य तैनाती केली आहे.
या विस्तारामागे बांग्लादेश आर्मी, सैन्य तळांचं आधुनिकीकरण करायचं असल्याचं कारण देत आहे. बांग्लादेश आर्मीचे प्रमुख वकर-उज जमान यांनी अलीकडेच एका बैठकीत 2030 पर्यंत सैन्य आधुनिकीकरणाची योजना असल्याचं म्हटलं होतं. यासाठी बांग्लादेशकडून नव्याने प्रयत्न सुरु आहेत. नवीन शस्त्रास्त्रांची खरेदी केली जात आहे. बांग्लादेश आर्मी त्याच आधुनिकीकरणासाठी लालमोनिरहाट एअर बेसचा विस्तार करत आहे. हा बांग्लादेशातील सर्वात मोठा एअर बेस आहे. बांग्लादेशात एकूण 9 एअरबेस आहेत. बहुतांश एअर बेस हे बांग्लादेशच्या स्वातंत्र्याच्या आधीचे आहेत.
किती फायटर जेटच्या पार्किंगची व्यवस्था?
एअर बेस विस्तार प्लान अंतर्गत सर्वातआधी नए हँगरचं निर्माण केलं जात आहे. त्यानंतर पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. जिथे एकावेळी कमीत कमी 10 ते 12 फायटर जेट तैनात करता येतील. या बेस वरील वर्तमान रडार सिस्टिम सुरु असली, तरी ती जुनी आहे. बांग्लादेश सरकार रडार सिस्टिमही बदलणार आहे. बांग्लादेशचे अधिकारी या एअर बेसवर चीनची JSG-400 TDR रडार सिस्टिम बसवणार आहेत. बांग्लादेश या वर्षी जितक्या शस्त्रास्त्रांची खरेदी करणार आहे, त्यातली 70 टक्के चिनी शस्त्र आहेत.
भारतासाठी हा भाग किती महत्वाचा?
लालमोनिरहाट एअर बेस बांग्लादेशच्या लालमोनिरहाट जिल्ह्यामध्ये आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या जलपाईगुड़ी आणि कूचबिहारला लागून आहे. संवेदनशील चिकन नेक कॉरिडोरजवळ हा भाग आहे. हा कॉरिडोर पूर्वोत्तर भारतला अन्य देशांशी जोडतो. युद्ध किंवा संकट काळात इथे स्थिती बिघडली, तर पूर्वोत्तर भारतात पुरवठा आणि संचार नेटवर्क प्रभावित होईल. याचवर्षी चीन दौऱ्यावर असताना बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी चिकन नेक कॉरिडोरबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











