IND vs SA : जसप्रीत बुमराहची ‘वादग्रस्त’ टिप्पणी चर्चेत! टेम्बा बावुमाला ‘बुटका’ म्हणाल्याचा VIDEO होतोय व्हायरल

Bumrah's cheeky 'short' jibe at Bavuma goes viral during Eden Gardens dominance
Jasprit Bumrah Controversial Comment on Temba Bavuma : भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ईडन गार्डन्सवर आमनेसामने आहेत. या सामन्याच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहने गोलंदाजीत तर चमकलाच, पण त्याचं एक वाक्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाबद्दल ‘विवादास्पद’ टिप्पणी केली आहे.
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-ब्रेकपर्यंत ८ गडी गमावून १५४ धावांवर खेळत होता. बुमराहने या डावात ५ विकेट्स घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने एडन मार्करम आणि रायन रिकेल्टन या सलामीवीरांना लवकर बाद केले. यानंतर बावुमा बुमराहच्या रडारवर होता.

बावुमाबद्दल काय म्हणाला बुमराह?

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १३ व्या षटकातील ही घटना आहे. बुमराहने षटकातील शेवटचा चेंडू बावुमाला टाकला, जो थेट त्याच्या पॅडच्या वरच्या बाजूला लागला. यावर भारतीय संघाने जोरदार पायचीत (LBW) अपील केले, पण पंचांनी ते फेटाळले. यानंतर भारतीय खेळाडूंमध्ये रिव्ह्यू (DRS) घ्यायचा की नाही, यावर चर्चा सुरू झाली.

हेही वाचा – Mohammed Shami : ट्रेडिंग विंडोमध्ये मोठा धमाका! शमीने सनरायझर्स हैदराबादला ठोकला रामराम, आता ‘या’ संघात दाखल

यावेळी यष्टिरक्षक ऋषभ पंतने चेंडू खूप वर लागल्यामुळे रिव्ह्यू न घेण्याचा सल्ला देत होता आणि उंचीबद्दल बोलत होता. त्याचवेळी बुमराह म्हणाला की, “अरे हा पण तो बुटका आहे ना. पंतने लगेच उत्तर दिले, “ते ठिके पण चेंडू पॅडच्या वर लागला आहे.” अखेरीस, संघाने रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला. नंतर बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू लेग स्टंपवरून जात असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – IND vs SA : जसप्रीत बुमराहची कमाल! वसीम अक्रमला मागे टाकत SENA राष्ट्रांविरुद्ध रचला नवा इतिहास

बुमराहची गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी –

मैदानावर ही चर्चा झाली असली तरी, जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने पहिल्या दिवशी पूर्णपणे वर्चस्व गाजवले.
त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ७ षटकांत ९ धावा देत २ विकेट्स (४ मेडनसह) घेतल्या. यानंतर त्याने टोनी डी झॉर्जी, काईल वेरेन, केशव महाराज आणि हार्मर यांना बाद करत पहिल्याच दिवशी ५ विकेट्स पूर्ण केल्या. तसेच दिवसअखेर त्याने १४ षटकांत २७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या, ज्यात ५ मेडन षटकांचा समावेश होता.

The post IND vs SA : जसप्रीत बुमराहची ‘वादग्रस्त’ टिप्पणी चर्चेत! टेम्बा बावुमाला ‘बुटका’ म्हणाल्याचा VIDEO होतोय व्हायरल appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!