IND vs SA : कॅप्टन शुबमन गिल रुग्णालयात दाखल, दुसऱ्या कसोटीला मुकणार! टीम इंडिया अडचणीत

IND vs SA : कॅप्टन शुबमन गिल रुग्णालयात दाखल, दुसऱ्या कसोटीला मुकणार! टीम इंडिया अडचणीत
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी अर्थात रविवारी 16 नोव्हेंबरला लागणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताच्या 30 धावांच्या प्रत्युत्तरात 7 विकेट्स गमावून 93 रन्स केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे 63 धावांची आघाडी आहे. त्यामुळे भारताकडे दक्षिण आफ्रिकेला रविवारी झटपट गुंडाळून 2 अंकी आव्हान मिळवून सामना जिंकण्याची संधी आहे. अशात आता टीम इंडियाच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. कॅप्टन शुबमन गिल याला दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शुबमनला नक्की काय झालं?

शुबमना शनिवारी 15 नोव्हेंबरला पहिल्या डावात बॅटिंग करताना मानेला त्रास जाणवला. हा त्रास जास्त वाढला. त्यामुळे शुबमनला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर आता शुबमनला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे शुबमन या संपूर्ण मालिकेतूनच बाहेर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Source

Join Our WhatsApp Group!