IND vs SA : ‘यावर चर्चा होणार नाही…’, बुमराहने बावुमाबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर आफ्रिकेच्या कोचची पहिली प्रतिक्रिया

Bumrah Calls Temba Bavuma Short Ashwell Prince Reacts
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Jasprit Bumrah Calls Bavuma Short Prince Reacts : कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने प्रभावी कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावांवर संपुष्टात आणला. या दरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला ‘बुटका’ असे म्हटल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे बॉडी शेमिंगवरून बराच गदारोळ झाला.

प्रशिक्षक प्रिन्स यांची प्रतिक्रिया

आता या संपूर्ण प्रकरणावर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजी प्रशिक्षक एशवेल प्रिन्स यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एशवेल प्रिन्स यांनी या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, “नाही. यावर कोणतीही चर्चा होणार नाही. ही गोष्ट माझ्या लक्षात प्रथमच आली आहे. जे घडले आहे, त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण होईल असे मला वाटत नाही.”

प्रिन्स यांनी पुढे बोलताना आपल्या संघाच्या कामगिरीवर आणि भारतीय गोलंदाजांच्या वर्चस्वावर भाष्य केले. ते म्हणाले की, “सिराज पहिल्या स्पेलमध्ये लयमध्ये नव्हता, पण त्याने दुसऱ्या स्पेलमध्ये साईड बदलल्यावर चांगली गोलंदाजी केली. त्याने त्याची लय आणि लाईन अचूक पकडली.”

हेही वाचा – Asian Archery Championships : भारत आशियाई तिरंदाजी स्पर्धेचा ठरला बादशहा! १० पदकांसह पटकावले अव्वल स्थान

प्रिन्स पुढे म्हणाले, “पण बुमराह सातत्याने धावा वाचवत होता आणि फिरकी गोलंदाजही खूप चांगले होते. मला वाटते की काही चेंडू चांगले होते आणि कधीकधी फलंदाजही चांगली कामगिरी करतात. याबद्दल आपण फार काही करू शकत नाही. आम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. खेळात अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि आम्ही दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करू अशी आशा आहे.”

हेही वाचा – IND A vs UAE : वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने वेधलं लक्ष! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकलं वादळी शतक

१३ व्या षटकातील घटना –

जसप्रीत बुमराहने टेम्बा बावुमाला ‘बुटका’ म्हटल्याची घटना दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १३ व्या षटकात घडली होती. बुमराहने बावुमाला चेंडू टाकल्यानंतर एलबीडब्ल्यूची जोरदार अपील केली होती. यावेळी डीआरएस (DRS) घ्यायचा की नाही, यावर यष्टिरक्षक ऋषभ पंत आणि बुमराह यांच्यात चर्चा सुरू असताना बुमराहने बावुमाला ‘बुटका’ म्हणून उल्लेख केला होता. पहिल्या दिवशी बुमराहने १४ षटकांत २७ धावा देत ५ विकेट्स घेतले. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

The post IND vs SA : ‘यावर चर्चा होणार नाही…’, बुमराहने बावुमाबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर आफ्रिकेच्या कोचची पहिली प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!