
Mitchell Marsh statement on his captaincy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे. मालिकेतील अखेरचा सामना शनिवारी (8 नोव्हेंबर) ब्रिस्बेन येथे पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला, ज्यामुळे मालिका भारताच्या नावावर झाली. सामना रद्द झाल्यानंतर झालेल्या सादरीकरण सोहळ्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने टी-20 विश्वचषक 2026 मधील नेतृत्वाबाबत एक महत्त्वाचे आणि आत्मविश्वासाने भरलेले विधान केले आहे.
‘मला वाटतं, मीच कर्णधार राहीन’ – मिचेल मार्श
सादरीकरणादरम्यान मिचेल मार्शला प्रश्न विचारण्यात आला की, टी-20 विश्वचषक 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व कोण करेल? आणि पॅट कमिन्स देखील कर्णधारपदाचा दावेदार आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना मार्शने अत्यंत आत्मविश्वासाने म्हटले, “मला वाटतं, मीच कर्णधार राहीन.”
कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह?
खरं तर, ऑस्ट्रेलियाने अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केलेला टी-20 विश्वचषक 2024 मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली खेळला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला आणि संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. यानंतर, भारताविरुद्धच्या मायदेशातील टी-20 मालिकेतही पराभव झाल्यामुळे, मार्शच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहेत. पण, त्याने दिलेल्या उत्तरावरून हे स्पष्ट होते की, भारत आणि श्रीलंकेत आयोजित होणाऱ्या पुढील टी-20 विश्वचषकातही तोच ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळेल.
हेही वाचा – Ranji Trophy 2025 : औकिब नबीचा रणजीत ‘कहर’! चार सामन्यात तिसऱ्यांदा ५ विकेट्स घेण्याचा केला पराक्रम
कमिन्सने मिळवून दिलेत दोन मोठे विश्वचषक –
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. या दोन्ही प्रसंगी ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. या यशस्वी नेतृत्वामागे, टी-20 विश्वचषकात कमिन्सला कर्णधार न बनवण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवडकर्त्यांनी घेतलेला निर्णय काहीसा आश्चर्यकारक होता. पुढील टी-20 विश्वचषकात कमिन्स खेळाडू म्हणून संघाचा भाग बनतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मार्शची वैयक्तिक कामगिरी –
भारताकडून टी-20 मालिकेत पराभूत होऊनही, मिचेल मार्शने कर्णधार आणि फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली आहे.
- मार्शची टी20 कारकीर्द: 34 वर्षीय या खेळाडूने 81 टी20 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 2,083 धावा केल्या आहेत. तसेच, त्याने 17 विकेट्स देखील घेतले आहेत.
- भारतीय खेळपट्ट्यांचा अनुभव: आयपीएल खेळत असल्यामुळे मार्शला भारतीय खेळपट्ट्यांचा चांगला अनुभव आहे, जो टी-20 विश्वचषकात त्याला आणि ऑस्ट्रेलियाला उपयुक्त ठरू शकतो.
The post IND vs AUS : वर्ल्ड कप 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाची कमान कोण सांभाळणार? मिचेल मार्शने दिले ‘हे’ उत्तर appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











