ICC ODI Rankings : आयसीसी क्रमवारीत मोठा उलटफेर! विराट कोहलीने न खेळताच बाबर आझमला टाकलं मागे

Rohit Tops ICC ODI Rankings as Babar Slips, Kohli Gains Without Playing
ICC ODI Rankings Babar Slips and Kohli Gains : आयसीसीने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा 781 गुणांसह क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. मात्र, या क्रमवारीत पाकिस्तानच्या बाबर आझमला त्याच्या खराब फॉर्ममुळे मोठे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे भारताच्या विराट कोहलीला कोणताही सामना न खेळता फायदा झाला आहे. या बदलाने क्रिकेट जगतात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

रोहित शर्मा अव्वल स्थानी कायम –

ताज्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, रोहित शर्मा अव्वल स्थानी कायम आहे. त्याच्यापाठोपाठ अफगाणिस्तानचा इब्राहिम झाद्रान 764 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल 746 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे, तर भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल 745 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

या क्रमवारीत सर्वात मोठा बदल विराट कोहलीच्या स्थानात झाला आहे. आता कोहली 725 गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर त्याने कोणताही वनडे सामना खेळलेला नाही, किंवा त्याच्या गुणांमध्येही बदल झालेला नाही, तरीही तो टॉप-5 मध्ये पोहोचला आहे. मागील क्रमवारीत तो सहाव्या स्थानावर होता.

हेही वाचा – PAK vs SL : इस्लामाबादमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात १२ ठार; तरी क्रिकेट सुरू, श्रीलंकन संघाला दिले ‘आर्मी’ गार्ड!

बाबरच्या घसरणीमुळे विराटला फायदा –

विराटला फायदा होण्याचे कारण म्हणजे खराब फॉर्मशी झगडणाऱ्या बाबरला दोन स्थानांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे गुण आता 709 झाले असून, तो पाचव्या स्थानावरून थेट सातव्या क्रमांकावर घसरला आहे. त्यामुळे विराट कोहलीसह श्रीलंकेच्या चरिथ असलंकालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. असलंका आता सातव्यावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय, आयर्लंडचा हॅरी टेक्टर 708 गुणांसह आठव्या आणि भारताचा श्रेयस अय्यर 700 गुणांसह नवव्या स्थानावर कायम आहे.

राशिद खान गोलंदाजांमध्ये नंबर-वन –

एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान पहिल्या स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज दुसऱ्या क्रमांकावर टिकून आहे. तर, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने दोन स्थानांची झेप घेत तिसरे स्थान पटकावले आहे.

हेही वाचा – RCB Home Ground : IPL 2026 पूर्वी विराटच्या आरसीबीला मोठा झटका! होम ग्राउंड बदलल्यामुळे बंगळूरुऐवजी ‘या’ शहरात होणार सामने

भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवनेही एक स्थान सुधारत सातव्यावरून सहाव्या क्रमांकावर मजल मारली आहे. सध्या, कुलदीप यादव हाच टॉप-10 मध्ये असलेला भारताचा एकमेव गोलंदाज आहे. त्याच्याव्यतिरिक्त, रवींद्र जडेजा 13व्या आणि मोहम्मद सिराज 16व्या स्थानावर आहेत.

The post ICC ODI Rankings : आयसीसी क्रमवारीत मोठा उलटफेर! विराट कोहलीने न खेळताच बाबर आझमला टाकलं मागे appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!