
प्रभात वृत्तसेवा
मंचर – नुकत्याच पार पडलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने प्रथमच विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयाचे श्रेय भारतीय संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर हिने आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव गावडेवाडी येथील मायशा मंगेश शिंदे (वय 10) हिला दिले आहे.मायशा शिंदे ही स्व. दत्तात्रय व भरतशेठ उद्धवराव शिंदे यांची नात असून, मुंबई येथील डी. वाय. पाटील शाळेत पाचवीत शिकत आहे. विश्वचषक उपांत्य सामन्यापूर्वी राष्ट्रगीतावेळी मायशा शिंदे कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत उभी होती.
राष्ट्रगीत संपल्यानंतर तिने हरमनला मिठी मारून प्रेरणादायी संदेश दिला – मला माहित आहे. ऑस्ट्रेलिया चांगले खेळते, पण भारत नक्कीच त्याहून चांगले खेळेल. या शब्दांनी संपूर्ण संघामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. ऑस्ट्रेलियाने 339 धावांचे लक्ष्य दिल्यानंतर भारतीय संघ सुरुवातीला दबावाखाली होता; मात्र मायशाच्या शब्दांनी खेळाडूंना आत्मविश्वास दिला आणि भारताने विजय मिळवून इतिहास घडवला. या घटनेची दखल घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसह (आयसीसी) विविध माध्यमांनी मायशाचे कौतुक केले. आदर्शगाव गावडेवाडीच्या चिमुकलीने भारताला प्रेरणा देत विश्वविजेता बनवले, याचा सर्वत्र अभिमान व्यक्त होत आहे.
The post Harmanpreet Kaur : विश्वचषक विजयाचं श्रेय १० वर्षांच्या मुलीला! कोण आहे ही आंबेगावची मायशा शिंदे? appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











