
Gujarat – गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला आहे आणि तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी दोन उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत, तर एक हैदराबादचा आहे. हे तीन दहशतवादी शस्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आले होते. ते देशभरात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होते.
गुजरात एटीएस पथक गेल्या वर्षभरापासून या दहशतवाद्यांवर लक्ष ठेवून होते. चौकशीदरम्यान, हे दहशतवादी आयसिसशी जोडलेले असल्याचे आणि देशात मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया करण्याची तयारी करत असल्याचे उघड झाले. सध्या या तिन्ही दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे आणि एटीएस या नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या इतरांचा शोध घेत आहे.
संशयित दहशतवाद्यांची ओळख पटली असून मोहम्मद फैक, मोहम्मद फरदीन, सफिउल्लाह कुरेशी आणि झीशान अली अशी त्यांची नावे आहेत. गुजरात एटीएसच्या डीआयजीने म्हटले आहे. आम्हाला आढळले की, मोहम्मद फैक एका पाकिस्तानी व्यक्तीच्या संपर्कात होता आणि भारतात जिहादी कारवाया पसरवण्याच्या मार्गांवर चर्चा करत होता. त्यानंतर, हे चौघेही एटीएसच्या रडारवर आले.
The post Gujarat : मोठा दहशतवादी कट उघड.! गुजरातमध्ये ३ दहशतवादी जेरबंद; देशभरात हल्ल्यांचा डाव होता तयार appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











