
मुंबई : निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. राज्यात काही ठिकाणी या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत, काही ठिकाणी स्थानिक समिकरण लक्षात घेऊन युती आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहे.
तर काही ठिकाणी पक्षांनी स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जयवंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला आहे.
जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
एवढंच नाही तर या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले 20 हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय शिवसेना शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळा शहरातील शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
The post एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ; तब्बल 55 शाखाध्यक्ष अन् पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











