Donald Trump Tariffs : ट्रम्प यांनी टॅरिफ कमी करताच अनेक देशांना लागली लॉटरी; भारताला काय फायदा होणार?

Donald Trump Tariffs : ट्रम्प यांनी टॅरिफ कमी करताच अनेक देशांना लागली लॉटरी; भारताला काय फायदा होणार?
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Donald Trump Tariff Decision : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह इतरही काही देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अमेरिकेचे अनेक देशांशी असलेले संबंध बिघडले होते. त्याचा परिणाम म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला चांगलाच फटका बसला. ट्रम्प यांनी समर्थन दिलेल्या उमेदवाराचा न्युयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. विशेष म्हणजे अमेरिकेत महागाईचाही मुद्दा फारच तापलेला आहे. त्यामुळेच ट्रम्प यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित आयात वस्तूवरील टॅरिफ कमी करण्याची घोषणा केली आहे. त्याचा फायदा आता अनेक देशांना होणार आहे.

नेमका काय निर्णय घेण्यात आला?

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (15 नोव्हेंबर) मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या वस्तूंवरील टॅरिफ कमी केला आहे. या आदेशावर सहीदेखील झाली असून तो गुरुवारपासून (13 नोव्हेंबर) लागू होणार आहे. या निर्णयाअंतर्गत बीफ, टोमॅटो, कॉफी, केळी यासारख्या जवळपास 100 पेक्षा अधिक शेतीशी निगडित वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्यात आला आहे. या आदेशाचा मेक्सिको आणि स्वित्झर्लंड या देशांना मोठा फायदा होणार आहे.
सीएनएनच्या रिपोर्टनुार डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत रेसिप्रोकल टॅरिफ असलेल्या वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्यात आला आहे. असे असले तरी या वस्तू पूर्णपणे टॅरिफमुक्त करण्यात आलेल्या नाहीत.

दोन देशांना होणार मोठा फायदा

उदाहरणादाखल मेकिस्कोतून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या टोमॅटोंवरील 17 टक्के टॅरिफ कायम असेल. मेक्सिकोला या निर्णयाचा फायदा होणार आहे. सोबतच स्वित्झर्लंडाही त्याचा फायदा होईल. स्वित्झर्लंडवरील आयातशुल्क आता 39 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. भारतावरील टॅरिफ मात्र अद्याप कमी करण्यात आलेला नाही. परंतु लवकरच भरतावरील टॅरिफही कमी केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा फायदा भारताला होऊ शकतो.

ट्रम्प यांनी टॅरिफ का मागे घेतला?

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केल्यानंतर अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसला. परंतु या निर्णयाची झळ अमेरिकेलाही सोसावी लागली. अमेरिकेत काही वस्तूंची टंचाई निर्माण झाली. परिणामी काही वस्तू महागही झाल्या. त्याचा परिणाम अमेरिकेतील लोकांमध्ये ट्रम्प यांच्या विरोधी मत तयार झाल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळाले. प्रतिष्ठेची असलेली न्यूयॉर्क महापौरपदाची निवडणूक ट्रम्प यांचे समर्थन असलेल्या उमेदवाराला गवमवाी लागली. या सर्व घडामोडीनंतर आता ट्रम्प यांनी टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!