
वॉशिंग्टन : एच१-बी व्हिसाची संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी, अशा आशयाची मागणी करणारे विधेयक संसदेमध्ये मांडणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या मार्जोरी टेलर ग्रीन यांच्यावर ट्रम्प संतप्त झाले आहेत. ग्रीन या अलिकडेच त्यांच्या अजेंड्याशिवायच्या अन्य विषयांवर बोलल्या. मला जे दिसते आहे, ते म्हणजे मार्जोरी विक्षिप्तपणे बोलत आहेत. त्या केवळ तक्रारी, तक्रारी आणि तक्रारी करत आहेत, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
एच१-बी व्हिसावर पुर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारे विधेयक आपण संसदेत सादर करणार असल्याचे ग्रीन यांनी नुकतेच म्हटले होते. अमेरिकेतल्या युवकांना अधिक रोजगार उपलब्ध व्हावेत आणि अमेरिकेतील नागरिकांना अधिक घरे मिळावीत, यासाठी एच१-बी वर पुर्ण बंदी घालण्यात यावी. केवळ वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांना हाव्हिसा मिळावा. त्याचे प्रमाणही दरवर्षी कमी केले जावे, असे या विधेयकात सुचवले असणार असल्याचे ग्रीन म्हणाल्या होत्या.पण त्यांची विचारसरणी कमालिची डावीकडे झुकली आहे. त्यांचे हे वक्तव्य कमी बुद्ध्यांक असलेल्या निवेदकांचा द्वेष करणाऱ्या रिपब्लिकन सदस्यांचे लक्षण आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
रिपब्लिकन सदस्या मार्जोरी टेलर ग्रीन यांना आपला पाठिंबा आपण मागे घेत असल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर केले. पुढच्या वर्षी होणाऱ्या मणध्यावधी निवडणुकीत ग्रीन यांच्याविरोधात जर योग्य उमेदवार उभा असल्यास आपण त्या विरोधी उमेदवारालाच पाठिंबा देऊ असेही ते म्हणाले.ग्रीन या ट्रम्प यांच्या एकेकाळच्या समर्थक आहेत आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन या उद्देशानुसार काम करणाऱ्या रिपब्लिकन नेत्या आहेत, असे मानले जाते आहे.
The post Donald Trump : एच१-बी व्हिसाविरोधी विधेयक मांडणाऱ्या नेत्या मार्जोरी टेलर ग्रीन यांच्यावर ट्रम्प संतापले appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











