Do You Know: सरकारी अधिकारी हिरव्या पेनाने का करतात स्वाक्षरी? 99 टक्के लोकांना माहिती नाही

Do You Know: सरकारी अधिकारी हिरव्या पेनाने का करतात स्वाक्षरी? 99 टक्के लोकांना माहिती नाही
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Government Officials : आपल्या शाळेत, महाविद्यालयांमध्ये, कार्यालयांमध्ये सर्वांनाच काही नियम अथवा अटींचे पालन करावे लागते. त्यात अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश आहे. उदाहरणा दाखल यामध्ये पेन्सिल, पेन वा इतर स्टेशनरीचा वापर करण्याचे नियम असतात. शाळेत अनेक शिक्षक लाल रंगाच्या पेनाचा वापर करतात. तर विद्यार्थ्यांना निळा अथवा काळा पेन वापरण्यास सांगितले जाते. पण सरकारी कार्यालयात गेल्यावर मात्र एक वेगळाच अनुभव येतो. खासकरून राजपत्रित अधिकारी (Gazetted Officers) हिरव्या रंगाच्या पेनाचा वापर करतात. पण ते हा पेन का वापरतात? काय आहे याविषयीचा नियम?

याविषयी एका युझरने नावाजेली साईट कोरा (Quora) मध्ये हा प्रश्न विचारला. सरकारी अधिकारी अधिकृत दस्तावेजीवर हिरव्या रंगाने स्वाक्षरी का करतात असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दुसऱ्या युझरने उत्तर दिले. त्याच्या मते केवळ सरकारी अधिकाऱ्यांनाच हा विशेष अधिकार देण्यात आला आहे. इतर कुणालाही अशा रंगाच्या पेनाचा वापर करण्याचा अधिकार नाही.

काय आहे कारण?

याचे मुख्य कारण म्हणजे हिरव्या रंगाच्या स्वाक्षरीचा वापर करून फसवणूक करणे अवघड असते. एखादा व्यक्ती हिरव्या रंगाच्या पेनाने बनावट स्वाक्षरी करू शकतो. पण हिरव्या रंगामुळे स्वाक्षरी अधिक सुस्पष्ट दिसते आणि दाब लक्षात येतो. त्यामुळे बनावट स्वाक्षरी उघड होते. तर हिरव्या रंगाच्या स्वाक्षरीमुळे तो अधिकारी इतर सहकर्मचाऱ्यांपेक्षा स्वतंत्र भासतो. त्याला विशेष अधिकार दिल्याचे हे प्रतिनिधीक रुप मानण्यात येते.

हिरवी स्वाक्षरी एक प्रोटोकॉल

तर एका अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तरानुसार, हिरव्या रंगाच्या पेनाने स्वाक्षरी करणे हा एक प्रोटोकॉल आहे. एखाद्या पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्या पदावरील अधिकाऱ्याला हिरव्या रंगाच्या पेनाने स्वाक्षरी करण्याची मुभा देण्यात येते. त्यानुसार, बँकेतही सहायक महाप्रबंधक आणि निरीक्षक हे हिरव्या रंगाच्या पेनाने स्वाक्षरी करतात. त्यावरून त्यांच्या पदाचा अधिकार सिद्ध होतो. हा नियम अंतर्गत बँकिंग व्यवस्थेत त्या व्यक्तीचे मोठेपण आणि त्याचा अधिकार याचे प्रमाण सिद्ध करते.

हिरव्या रंगाच्या पेनाचा वापर केल्यामुळे त्यामागील तीन स्पष्ट उद्देश समोर येतात. अधिकाऱ्याची पद प्रतिष्ठा, सत्यता आणि स्वाक्षरीची सुरक्षा हे त्यातून स्पष्ट हबोते. हा नियम लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो. हा त्या अधिकाऱ्यांना इतरांपासून वेगळा दाखवतो. हिरवा पेनाने केलेली स्वाक्षरी दिसली तर त्या पदाची प्रतिष्ठा आणि सत्यता तुमच्या लक्षात येईल.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!