Dipika Kakkar : ना स्मोकिंग ना ड्रिंकींग… तरीही दीपिका कक्करला कसा झाला कॅन्सर ? साश्रूनयानांनी सांगितली वेदनेची कहाणी..

Dipika Kakkar : ना स्मोकिंग ना ड्रिंकींग… तरीही दीपिका कक्करला कसा झाला कॅन्सर ? साश्रूनयानांनी सांगितली वेदनेची कहाणी..
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

‘ससुराल सिमर का’ मधून प्रचंड लोकप्रिय झालेली अभिनेत्री दीपिका कक्कर ही सध्या कॅन्सरसारख्या मोठ्या आजारशी झुंज देत आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिकाला तिच्या स्टेज 2 लिव्हर कॅन्सरबद्दल समजलं. तिला जो ट्यूमर झाला होता तो एखाद्या टेनिस बॉलइतका मोठा होता, त्यामध्ये कॅन्सरस सेल्स असल्याचे नंतर समोर आले होते. त्यानंतर दीपिकाचे ऑपरेशनही झाले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून यावर ट्रीटमेंट सुरू असलेल्या दीपिकाने नुकतीच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचया पॉडकास्टसाठी हजेरी लावली.

यावेळी ती तिच्या कॅन्सर जर्नीबद्दलही बोलली. गरोदरपणात मला वेदना होत होत्या, मात्र त्याकडे मी दुर्लक्ष केलं, असं दीपिकाने सांगितलं. मात्र डिलीव्हरीनंतर असं आढळन आलं की परिस्थिती आधीपेक्षा अधिक गंभीर आहे आणि कर्करोग असल्याचंही निष्पन्न झालं. पती शोएबशिवाय मी कोणत्याही चाचण्या करू शकत नाही असंही दीपिकाने नमूद केलं.

ती प्रतीक्षा जीवघेणी

यावेळी बोलताना दीपिकाने सांगितलं की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिची फॅपी टेस्ट होती. तुमच्या शरीरात कर्करोग आहे की नाही आणि जर असेल तर तो कुठे पसरला आहे हे या टेस्टमधून हे समजतं. शोएब इब्राहिमने त्याच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये या चाचणीचा उल्लेख केला होता. त्या टेस्ट्स केल्यावर त्याच्या रिझल्टची प्रतीक्षा खूपच जीवघेणी असते, असे नमूद केलं.

लिव्हरचा 22 टक्के भाग कापला

याबद्दल बोलताना दीपिका म्हणाली, ” माझा कर्करोग फक्त माझ्या ट्यूमरमध्ये होता. गेल्या वेळी आम्ही स्कॅन केला तेव्हा माझ्या शरीरात इतरत्र कुठेही कर्करोगाच्या पेशी नव्हत्या. माझ्या लिव्हरचा 22 टक्के भाग काढून टाकण्यात आला, तो 11 सेंटीमीटरचा मोठा तुकडा होता. त्यासोबत ट्यूमर निघून गेला, कॅन्सर गेला. आम्ही ट्यूमर मार्कर चाचण्या देखील करत आहोत आणि त्या चाचण्या पॉझिटिव्ह येत आहेत. पण मी सध्या ओरल टार्गेटेड थेरपीवर आहे, जी केमोथेरपीसारखीच आहे. मी ती घेत असून 2 वर्ष चालेल. कोणत्याही प्रकारचा कर्करोग परत येऊ नये म्हणून या दोन वर्षांत, त्याचे बारकाईने निरीक्षण करावे लागेल. म्हणून, वेळोवेळी स्कॅनचे करावे लागेल” असं तिने सांगितलं.

स्मोकिंग -ड्रिकींग नाही तरी झाला कॅन्सर

यावेळी हर्षने तिला विचारलं की तू कोणत्याही प्रकारचा नशा करत नाहीस, कधी दारू प्यायली नाही, तरीही तुला कॅन्सरसारखा मोठा आजार कसा झाला ? त्यावर दीपिका म्हणाली, “खरं सांगायचं तर, कोकिलाबेन हॉस्पिटलमधील माझे सर्जन खूप चांगले आहेत. ते, तसेच माझे फॅमिली डॉक्टर आणि माझ्या ओळखीचे इतर सर्व लोक म्हणतात की जर तुम्ही आम्हाला विचारलं की हे (कॅन्सर) तुमच्यासोबत कसं घडलं, तर आमच्याकडे उत्तर नाही. सर्व डॉक्टरांनी मला हेच सांगितलं.” असं दीपिकाने नमूद केलं

यामागे काही कारण नसतं का असा प्रश्न भारतीने विचारतात दीपिका म्हणाली, काहीतरी कारण असेल. एखादी विषारी गोष्ट तर (शरीरात) गेलीच असेल ज्यामुळे हा आजार झाला. ते सगळं देवाला चांगलं माहीत असेल. आपण तर त्याबद्दल काही सांगू शकत नाही. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे, मी कधीही मद्यपान केलेले नाही, मी कधीही धूम्रपान केलेले नाही. मी फक्त अधूनमधून बाहेर जेवते. पण जेव्हा ज्या गोष्टी घडायच्या असता, तेव्हा त्या घडतातचं , असं तिने नमूद केलं.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!