धक्कादायक.! नवजात मुलाला ५ लाखांना विकण्याचा प्रयत्न; महिलेसह ५ जणांवर गुन्हा दाखल

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मुंबई – मुंबईतील शिवाजीनगर गोवंडी भागात नवजात मुलाला ५ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंडी येथील एका नर्सिंग होममध्ये २१ वर्षीय अविवाहित महिलेने अकाली बाळंतपण केले होते.

कार्यकर्त्या बिनू वर्गीस यांनी नवजात बाळ विकल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर देवनार पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक तपास सुरू करण्यासाठी नर्सिंग होममध्ये पोहोचले.

नर्सिंग होमचे मालक डॉ. कयामुद्दीन खान, कर्मचारी अनिता पोपट सावंत, बाळाची आई, एजंट शमा आणि बाळ खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दर्शना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नर्सिंग होममधील आणखी काही कर्मचारी यात सहभागी असल्याचा संशय आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

The post धक्कादायक.! नवजात मुलाला ५ लाखांना विकण्याचा प्रयत्न; महिलेसह ५ जणांवर गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!