ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र कालपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली. अखेर आज ही दुःखद बातमी समोर आली आहे. या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सदाबहार अभिनेते म्हणून ओळखले जात होते. आपल्या दमदार अभिनयाने आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने त्यांनी अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते, ज्यात त्यांनी जुन्या आणि नव्या पिढीतील अनेक कलाकारांसोबत काम करत आपली छाप पाडली. त्यांची लोकप्रियता आणि अभिनयाची जादू आजही कायम आहे. शोले, धर्म-वीर, चुपके चुपके यांसारख्या अनेक आयकॉनिक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











