Delhi Red Fort Blast : दिल्‍ली स्‍फोटात तुर्की कनेक्‍शन? लाल किल्‍ल्‍याची जानेवारीत अनेक वेळा रेकी

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Delhi Red Fort Blast – पोलिसांनी अलीकडेच व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यानंतर अटक केलेल्या डॉ. मुझम्मिल शकील आणि डॉ. मोहम्‍मद उमद यांचे तुर्कीशी संबंध असल्‍याचे दिसून येत आहे. तसेच त्‍यांनी जानेवारीमध्ये लाल किल्ला परिसरात अनेक ठिकाणी रेकी केल्‍याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली. दरम्‍यान, दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून बॉम्बस्फोटचे इंटरनॅशनल कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे.

तपासादरम्यानअसे आढळून आले की, स्फोट झालेल्या हुंडई आय२० कार चालवणारे दोन प्रमुख संशयित डॉ. उमर आणि डॉ. मुझम्मिल हे तुर्कीला गेले होते. डॉ. मोहम्मद उमर व डॉ. मुझम्मिल शकील यांच्या पासपोर्टवर परदेश प्रवासाच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्या पासपोर्टमध्ये तुर्की इमिग्रेशन स्टॅम्प सापडले आहेत. ते दोघे त्यांच्या प्रवासादरम्यान कोणत्या परदेशी हँडलरला भेटले होते का त्‍याचा शोध सुरू आहे. तसेच उमरचे फरीदाबादमध्ये अटक केलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित अटक केलेल्या संशयितांपैकी एक असलेला डॉ. मुझम्मिल गनी याने या वर्षी जानेवारीमध्ये लाल किल्ला परिसराची अनेकदा टेहळणी केली होती. पोलिसांनी त्याच्या मोबाइल डेटाचे विश्लेषण केल्यानंतर ही माहिती हाती लागली आहे.

पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की या दहशतवाद्यांनी २६ जानेवारी रोजी लाल किल्ला लक्ष्य करण्याची योजना आखली होती. त्याच कटाचा भाग म्हणून मुझम्मिल व त्याचे साथीदार जानेवारी महिन्यात सातत्याने लाल किल्ल्याची टेहळणी करत होते. मात्र, कडक बंदोबस्तामुळे त्यांना त्यांची योजना अंमलात आणता आली नाही.

दरम्‍यान, तपास यंत्रणांनी टेलिग्रामवरील धागेदोर तपासण्यास सुरुवात केली आहे. ज्या दोन टेलिग्राम ग्रुपद्वारे व्हाइट कॉलर मॉड्यूल तयार केले गेले ते दोन्ही ग्रुप पोलिसांनी शोधून काढले आहेत. तसेच इतरही काही टेलिग्राम ग्रुप्स शोधून काढले आहेत, ज्याद्वारे हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात असल्‍याची प्राथमिक माहिती समजते.

The post Delhi Red Fort Blast : दिल्‍ली स्‍फोटात तुर्की कनेक्‍शन? लाल किल्‍ल्‍याची जानेवारीत अनेक वेळा रेकी appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!