
दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी शक्तीशाली स्फोट झाला. या स्फोटाने दिल्ली हादरली. संध्याकाळी 6:52 मिनिटांनी शक्तीशाली स्फोट झाला. यात 9 जणांचा मृत्यू झाला. 20 जखमी आहेत. स्फोट इतका शक्तीशाली होता की, आसपासचा परिसर हादरला. परिसरात एकच गडबड, गोंधळाची स्थिती होती. i20 कारमध्ये हा स्फोट झाल्याचं तपासातून समोर आलय. घटनेच्या 3 तास आधी ही कार सुनहरी मशिदीजवळ उभी होती. स्फोटानंतर तपास करणाऱ्या दिल्ली स्पेशल सेलच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत. त्यावरुन हा स्फोट आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळत आहेत.
स्फोटाच्या आधी सोमवारी सकाळी जम्मू-काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी एक जॉइंट ऑपरेशन केलं. त्यांनी दोन वेगवेगळ्या घरातून 2,900 किलो IED बनवणारे केमिकल्स, शस्त्र आणि दारु गोळा जप्त केला. जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि अंसर गजवात-उल-हिंद (AGuH) यांच्याशी संबंधित आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्कचा पदार्फाश करताना ही सामग्री हाताला लागली. ही कारवाई आणि स्फोटाची वेळ याचा परस्परांशी किती संबंध आहे, त्या दृष्टीने तपास सुरु आहे. या दहशतवादी हल्ल्याचं डॉक्टर्स कनेक्शन समोर येतय.
डॉ. आदिल अहमद राठर
दिल्लीत स्फोट होण्याआधी काही घटना घडल्या. अनंतनागमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी डॉ. आदिल अहमद राठरला अटक केली. तो अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर आहे. त्याच्या लॉकरमध्ये पोलिसांना AK-47 रायफल सापडली. राठरचा संबंध जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवात-उल-हिंदशी आहे.
महिला डॉक्टर
दुसरी अटक 7 नोव्हेंबरला हरियाणाच्या फरीदाबादमध्ये झाली. अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये कार्यरत असलेली लखनऊची एक महिला डॉक्टर शाहीन शाहिदच्या कारमध्ये ‘कॅरोम कॉक’ नावाची असॉल्ट रायफल सापडली. तिचा या नेटवर्कमध्ये काय रोल आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या तिची ओळख पोलिसांनी सार्वजनिक केलेली नाही.
तिसऱ्या डॉक्टरचं शिक्षण चीनमध्ये
7 नोव्हेंबरला गुजरात एटीएसने अहमद मोहियुद्दीन सैयद नावाच्या डॉक्टरला पकडलं. हा डॉक्टर हैदराबादचा राहणारा आहे. चीनमध्ये त्याने शिक्षण घेतलय. चौकशीत समोर आलय की, रिसिन नावाचं एक खतरनाक विष तो बनवत होता. त्याने दिल्ली आजादपुर मंडी, अहमदाबादचं नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनऊच्या आरएसएस कार्यालय सारख्या गर्दीच्या ठिकाणांची रेकी केली होती.
चौथ्या डॉक्टरकडे 360 किलो अमोनियम नायट्रेट
या ऑपरेशनमध्ये चौथी अटक 10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून झाली. डॉ. मुझमिल शकील नावाच्या कश्मिरी डॉक्टरला अटक झाली. तो अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये शिकवत होता. त्याच्याकडे 360 किलो अमोनियम नायट्रेट सापडलं. बॉम्ब बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. मुझमिलच्या दुसऱ्या ठिकाणावर छापा मारला, तिथून 2563 किलो स्फोटकं सापडली. शकीलचा संबंध जैश सारख्या प्रतिबंधित संघटनेशी आहे असं फरीदाबाद पोलिसांनी सांगितलं.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











