Delhi Blast : दिल्‍ली स्‍फोट प्रकरणात एनआयएला मोठे यश ! आमिर रशीदला अटक

Delhi Blast
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्‍ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात आत्मघाती बॉम्बरसह दहशतवादी हल्ल्याचा कट रचलाचा ठपका ठेवत एनआयएने एका काश्मिरी नागरिकाला अटक केली आहे. या स्‍फोटात ८ निष्पाप नागरिकांचा मृत्‍यू झाला होता.

आमिर रशीद अली असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात सहभागी असलेली कार त्याच्या नावावर नोंदणीकृत होती. एनआयएने आमिर रशीदला दिल्लीतून अटक केली आहे. दिल्ली पोलिसांकडून प्रकरण ताब्यात घेतल्यानंतर एनआयएने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली.

एनआयएच्या तपासात असे दिसून आले की, आरोपी आमिर रशीद अली हा जम्मू आणि काश्मीरमधील पंपोर येथील सांबुरा येथील रहिवासी आहे. आरोपी आमिर रशीदने आत्मघाती बॉम्बर उमर उन नबीसह दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता. वाहनातून आयईडी स्फोटासाठी वापरण्यात येणारी कार खरेदी करण्यास मदत करण्यासाठी तो दिल्लीला आला होता.

फॉरेन्सिक तपासणीद्वारे एनआयएने वाहनातून आयईडी स्फोट घडवून आणणाऱ्या मृत चालकाची ओळख उमर उन नबी अशी केली आहे, जो पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आणि फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठात जनरल मेडिसिन विभागात सहाय्यक प्राध्यापक आहे.

The post Delhi Blast : दिल्‍ली स्‍फोट प्रकरणात एनआयएला मोठे यश ! आमिर रशीदला अटक appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!