ड्रग्जविरोधात श्रीलंकेची धडक कारवाई; तब्बल 1 हजार जणांना अटक

Arrest
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

कोलंबो : श्रीलंकेच्या पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविषयी एक धडक कारवाई सुरू केली असून तब्बल एक हजार जणांना अटक करण्यात आली आहे, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. अ नेशन युनायटेड असे नाव असलेल्या या व्यापक मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांचा मोठा साठा देखील जप्त केला आहे.देशातील ड्रग्जविरोधात व्यापक मोहिम सुरू केल्याची घोषणा अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी ३० ऑक्टोबर रोजी केली होती.

या मोहिमेला त्यांनी देशातील सर्वात मोठी सामाजिक चळवळ असे म्हटले होते. शुक्रवारी समाप्त झालेल्या या मोहिमेत तब्बल १,०५६ जणांना अटक करण्यात आली. हे सर्वजण अमली पदार्थांशी संबंधित उद्योगात गुंतलेले होते. या कारवाईमुळे हे नेटवर्क उद्ध्वस्त झाले. मागणी कमी झाली, ड्रग्जविरोधी कारवाईची व्याप्ती वाढली आणि ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांचे पुनर्वसनही केले जात असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे.

किमान ३९ संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि इतर ५३ जणांना पुनर्वसनासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच १४ गुन्हेगार संशयितांना आणि अटक वॉरंट टाळणाऱ्या २८८ जणांना अटक करण्यात आली. काल टाकलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी ३११ ग्रॅम हेरॉइन आणि १ किलो १७३ ग्रॅम क्रिस्टल मेथाम्फेटामाइन जप्त केले, असेही पोलिसांनी सांगितले.

The post ड्रग्जविरोधात श्रीलंकेची धडक कारवाई; तब्बल 1 हजार जणांना अटक appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!