Crime News : शेताच्या वादातून हल्ला: दोघे जखमी, लोखंडी गज व विटेचा वापर; शिरूर तालुक्यातील घटना

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

शिरूर : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील साबळेवाडी मध्ये जमीन मोजणीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात वडील–मुलासह दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अनिल पोपट भाईक (रा. साबळेवाडी, टाकळी हाजी) याच्याविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरीदास आनंता भाईक (वय ५६वर्ष ) रा. साबळेवाडी, टाकळी हाजी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते त्यांच्या घरासमोर बसले असताना आरोपी अनिल भाईक तेथे आला. फिर्यादी यांनी त्यांच्या गट क्रमांक 269 मधील सर्व्हे नंबरची खूण दाखवून, “तू हरी भाईक यांच्याकडून जमीन विकत घेतली आहेस, त्यांच्याकडून मोजणी करून घे,” असे समजावून सांगत असतानाच आरोपी संतापला.

या संतापातून आरोपी अनिल भाईक यांनी त्यांच्या हातातील लोखंडी गजाने हरीदास भाईक यांच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गज डोक्यावरून सरकल्याने फिर्यादींच्या डाव्या खांद्यावर जोराचा वार बसला व खांद्याचे हाड फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली.

जखमीला उपचारासाठी कारमध्ये बसवून घेऊन जात असतानाही आरोपी रस्त्यात अडवा उभा राहिला आणि जखमींना रुग्णालयात जाऊ न देण्यासाठी अडथळा आणला. त्यावेळी त्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. आरोपीने हरीदास भाईक यांचे वडील आनंता हरी भाईक यांच्यावरही विट फेकून मारली, ती विट त्यांच्या उजव्या गुडघ्यावर लागून दुखापत झाली. त्यांनाही आरोपीने शिवीगाळ व धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या हल्ल्यामुळे फिर्यादीच्या कुटुंबास जीविताचा धोका निर्माण झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे दि. ०८ नोव्हेंबर रोजी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अरुण उबाळे हे करीत आहेत. ग्रामीण भागातील वांरवार जमीन वादातून अशा घटना निर्माण होत आहे. झालेल्या या गंभीर हल्ल्याने स्थानिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

The post Crime News : शेताच्या वादातून हल्ला: दोघे जखमी, लोखंडी गज व विटेचा वापर; शिरूर तालुक्यातील घटना appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!