राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) विद्यार्थ्यांसाठी ‘सीईटी-अटल’ उपक्रम सुरू केला आहे. सामाईक प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मॉक टेस्ट आणि संज्ञानात्मक क्षमता मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. हा उपक्रम पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी महाविद्यालयांमध्ये चर्चासत्रे, माहिती पत्रिका आणि जाहिरातबाजीवर भर दिला जात आहे. अवघ्या दीड महिन्यांत एक लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विद्यार्थ्यांसाठी ‘CET Atal’ उपक्रमाचा पुढाकार
