
Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत सध्या अत्यंत चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते, मात्र त्यावेळी हे पाऊल खबरदारीचा उपाय म्हणून उचलण्यात आले होते.
मात्र, आज सकाळपासून धर्मेंद्र यांची तब्येत अधिक बिघडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचे रुग्णालयात ये-जा वाढलेले दिसत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आज सकाळी तब्येत अचानक खालावल्याने धर्मेंद्र यांना आयसीयू व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले आहे. डॉक्टरांच्या टीमकडून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू आहेत आणि ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे सांगितले जात आहे.
तथापि, धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालयाकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत त्यांच्या प्रकृतीविषयी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
The post Breaking News : अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत आणखी बिघडली; प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











