
आपल्यापैकी बरेच जण अंडं खातात. पण पांढऱ्या अंड्याप्रमाणेच काळंही अंडं असतं हे तुम्हाला माहीत आहे का ? जर तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा फिटनेसबद्दल खूप जागरूक असाल तर तुम्ही ऐकलं असेल की काळं अंडं (कडकनाथ अंडे) आणि पांढरं अंडं दोन्ही आरोग्यासाठी चांगले मानले जातात. पण या दोघांमधील फरक आणि जिममध्ये जाणाऱ्यांसाठी कोणते जास्त फायदेशीर आहे, ते तुम्हाला माहित आहे का? चला फरक आणि त्यांचे फायदे जाणून घेऊया.
काळं की पाढंरं अंडं, कोणतं फायदेशीर ?
काळं अंडं हे खरंतर मध्य प्रदेशातील काळ्या कोंबड्यांच्या एका खास जातीच्या कडकनाथ कोंबडीचं अंडं असते. या कोंबडीचे मांस आणि अंडी दोन्ही काळे असतात, परंतु हा काळा रंग कोणत्याही रासायनिक घटकामुळे नसून नैसर्गिक मेलेनिन रंगद्रव्यामुळे असतो. त्यात पांढऱ्या अंड्यापेक्षा कितीतरी पट जास्त प्रथिने, लोह, जस्त आणि अमिनो आम्ल असतात. म्हणूनच, त्याला “काळं सोनं” असंही म्हणतात. दुसरीकडे, पांढरी अंडी सहसा लेअर हेन म्हणजेच पांढऱ्याकोंबड्यांपासून मिळतात.ती अंडी सहज उपलब्ध होणारी आणि परवडणारी असतात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे डी, बी12 आणि कोलेस्टेरॉल देखील भरपूर प्रमाणात असते, जे सर्व स्नायूंच्या वाढीसाठी आणि बॉडी रिकव्हरीसाठी आवश्यक आहेत. पांढरं अंड हे विशेषतः बॉडीबिल्डींग करणाऱ्यांच्या डाएटमध्ये सर्वाधिक वापरलं जातं कारण ते हलकं आणि सहज पचण्याजोगा असतं.
जिम करणाऱ्यांसाठी कोणतं उत्तम ?
तसं पहायाल गेलं तर काळं आणि पांढर, ही दोन्ही अंडी जिममध्ये जाणाऱ्यांसाठी फायदेशीर आहेत, परंतु कडकनाथ अंडी थोडी अधिक पौष्टिक मानली जातातं. त्यात पांढऱ्या अंड्यांपेक्षा 10% जास्त प्रथिने आणि अतिशय कमी चरबी असते.
तसंच ते हे कोलेस्टेरॉल-फ्री आणि लोहाने समृद्ध आहे, जे मसल्स रिक्वहरी आणि एनर्जी लेव्हल सुधारते. अंड्याचा पांढरा भाग हाँ दैनंदिन प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यास आणि स्नायूंच्या वाढीस मदत करण्यास देखील मदत करतो.
काळी अंडी केवळ स्नायूंसाठीच नाही तर हृदय, मेंदू आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अमीनो ॲसिड ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि थकवा दूर करतात. तर पांढरी अंडी
ही हृदयाचे आरोग्य, हाडांची ताकद आणि वजन नियंत्रणास मदत करतात. दोन्ही अंडी पोषक तत्वं प्रदान करतात, परंतु फरक फक्त त्यांच्या पौष्टिक पातळीमध्ये आणि किंमतीत आहे.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











