Bihar Election Results 2025 : ढोल-ताशे अन् मिठाई… निकालापूर्वीच कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष, NDAच्या दणदणीत विजयामुळे बिहारमध्ये एकच कल्ला

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतमोजणीच्या ताज्या कलांनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत असून, राज्यात जोरदार जल्लोष सुरू झाला आहे. एनडीए सध्या 186 जागांवर आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) 84 जागांवर, तर जनता दल युनायटेड (जेडीयू) 76 जागांवर आघाडीवर आहे.

दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाआघाडी 49 जागांवर पिछाडीवर आहे. मागील निवडणुकीत 75 जागा जिंकणाऱ्या आरजेडीला यंदा केवळ 34 जागांवर समाधान मानावे लागत आहे. तेजस्वी यादव आणि खेसारीलाल यादव यांच्यासह अनेक प्रमुख उमेदवार आपापल्या मतदारसंघात पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या उमेदवारांनाही यश मिळालेले नाही.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!