
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 वाजल्यापासून सुरू होईल. हळूहळू करून सत्ता नेमकी कोणाच्या हाती येणार याचे काैल दुपारपर्यंत स्पष्ट होतील. सर्वच राजकीय पक्षांनी बिहारमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केली. विशेष म्हणजे यंदा बिहारमध्ये मतदानाचा टक्का चांगलाच वाढला. हे कोणासाठी फायदेशीर ठरले हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. दोन्ही टप्प्यांमध्ये एकत्रित 66.90 टक्के मतदान झाले, जे 2020 च्या तुलनेत 9 टक्के जास्त आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 65 टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात 69.90 टक्के मतदारांनी मतदान केले. सर्वांचे लक्ष आता आज 14 नोव्हेंबर 2025 च्या बिहारच्या 243 जागांसाठीच्या मतमोजणीकडे आहे. कोणाचे नशीब उजाडते आणि कोणाच्या पदरी निराशा पडते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. बिहारच्या महिलांना 10 हजार रूपये प्रत्येकी राज्य शासनाने निवडणुकीच्या तोंडावर दिले होते.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











