Bihar Election Results 2025 : तेजस्वी-राहुल गांधींच्या महाआघाडीचा धुव्वा, एनडीएची एकतर्फी आघाडी, बघा किती जागा?

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या कलांनुसार, एनडीएने दणदणीत बहुमत मिळवत स्पष्ट आघाडी घेतली आहे, तर तेजस्वी यादव आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा दारुण पराभव झाला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, एनडीए 186 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडीला केवळ 49 जागा मिळाल्या आहेत. ही आकडेवारी अशीच कायम राहिल्यास महाआघाडीला विरोधी पक्षनेता पदही मिळू शकणार नाही.

या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी प्रथमच प्रत्यक्ष राजकारणात उतरून आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले होते. मात्र, कलानुसार त्यांच्या एकाही उमेदवाराला अजून खाते उघडता आलेले नाही. रणनीतीकार म्हणून त्यांनी अनेक पक्षांना सल्ला दिला असला तरी, प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणे आणि सल्ला देणे यात फरक असतो, हे त्यांना या निकालातून समजले असेल असे दिसत आहे. महाआघाडीतील आरजेडी 33 जागांवर, तर काँग्रेस सिंगल डिजिटवर घसरली आहे. बिहारमधील हे चित्र महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीशी मिळतेजुळते असल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!