Bihar Election 2025 : “ते तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल…”; कुणाल कामराची निवडणूक आयुक्तांवर जोरदार टीका

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bihar Election 2025 । Kunal Kamra : बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ची मतमोजणी सध्या सुरु असून, आतापर्यंतचे कल एनडीएच्या बाजूने दिसत आहेत. आतापर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीए २०० जागांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे, तर महागठबंधन केवळ ३९ जागांवर आघाडीवर आहे. या विजयी आघाडीवर भाजपने देशभरात जल्लोष साजरा केला असून, विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे.

यानंतर आता एनडीए, भाजपा आणि निवडणूक आयोगावर स्टँड अप कॉमेडियन कुणार कामरा याने जोरदार निशाणा साधला आहे. कुणाल कामरा याने एक्सवर पोस्ट शेअर करत निवडणूक आयुक्तांवर टीका केली आहे. ज्ञानेश कुमार यांना नेपाळला पाठवा. तिथेही भाजपाचे सरकार स्थापन होईल, असे कामरा याने म्हटले आहे.

दरम्यान, ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले, त्यानुसार, एनडीएत घटक पक्ष असलेल्या भाजपाचे ९५ उमेदवार आघाडीवर आहेत. तर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेट पक्षाचे ८५ उमेदवार आघाडीवर आहेत. महागठबंधनचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे २४ उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर आहे.

The post Bihar Election 2025 : “ते तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल…”; कुणाल कामराची निवडणूक आयुक्तांवर जोरदार टीका appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!