Bihar Election 2025 : जेल का फाटक टूटेगा, हमरा शेर छूटेगा.! तुरुंगात असलेल्या ‘छोटे सरकारच्या’ घरी मतमोजणीआधीच विजयाचा जल्लोष सुरु

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bihar Election 2025 | mokama anant singh : मोकामा विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जेडीयूचे उमेदवार आणि सध्या तुरुंगात असलेले ‘अनंत सिंह’ यांच्या समर्थकांनी त्यांच्या सुटकेची आशा व्यक्त करणारी पोस्टर्स शहरात ठिकठिकाणी लावली आहेत. ‘जेल का फाटक टूटेगा, हमरा शेर छूटेगा’ असा संदेश असलेली ही पोस्टर्स राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करत आहेत. पोलिसांनीही या घडामोडींमुळे सतर्कता वाढवली आहे.

निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच मोकाम्यात अनंत सिंह यांच्या विजयाची लाट निर्माण करण्यात आली आहे. येथे अनंत सिंह आणि आरजेडीच्या वीणा देवी यांच्यात थेट सामना होत आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 13व्या फेरीअखेर अनंत सिंह हे 16 हजार मतांच्या आघाडीवर आहेत.

सोशल मीडियावर अनंत सिंह चर्चेत :

अनंत सिंह यांची लोकप्रियता सोशल मीडियावरही चांगलीच वाढलेली आहे. अलीकडेच त्यांनी अत्याधुनिक बुलेटप्रुफ टोयोटा लँड क्रूझर ZX ही लक्झरी एसयुव्ही ताफ्यात सामील केली आहे. पटण्यात ही गाडी येताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. या कारची किंमत 3 ते 4 कोटी असल्याचे बोलले जाते. छोटे सरकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनंत सिंह यांची ही कार देशातील सर्वात ताकदवार कारमध्ये गणली जाते.

अटक आणि आरोप :

2 नोव्हेंबर रोजी जन सुराज समर्थक दुलारचंद यादव यांच्या हत्येप्रकरणी पुलिसांनी अनंत सिंह यांना अटक केली. पोस्टमार्टम अहवालानुसार, यादव यांच्या छातीत व फुफ्फुसांमध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आरोप आहे की ही दुखापत जड वस्तूने मारल्यामुळे झाली. अनंत सिंह यांच्यावर एकूण 28 गुन्हे दाखल आहेत, तरीही मोकाम्यातील त्यांचे वर्चस्व निर्विवाद मानले जाते.

अनंत सिंह यांचा राजकीय प्रवास :

2005: पहिल्यांदा आमदार

2010: जेडीयूच्या तिकिटावर पुनर्निवड

2015: जेडीयूचा त्याग करून अपक्ष म्हणून विजय

2020: आरजेडीच्या तिकिटावर निवडून

2022: शस्त्रास्त्र प्रकरणी दोषी; पत्नी नीलम देवी यांनी पोटनिवडणूक जिंकली

2025: पुन्हा जेडीयूमध्ये पुनरागमन; मोकामाचे उमेदवार

The post Bihar Election 2025 : जेल का फाटक टूटेगा, हमरा शेर छूटेगा.! तुरुंगात असलेल्या ‘छोटे सरकारच्या’ घरी मतमोजणीआधीच विजयाचा जल्लोष सुरु appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!