Bhor News : भोरच्या दुर्गम भागाचा आरोग्यदूत! भाटघर धरणग्रस्तांसाठी ‘पाण्यावरचा दवाखाना’ पुन्हा सुरू

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
भोर –
भोर पंचायत समिती आरोग्य विभाग अंतर्गत भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या पश्चिम भागातील नागरिकांना लॉंचद्वारे वैद्यकीय सेवा दरवर्षी पुरवली जाते. यावर्षी हा तरंगता दवाखाना जवळपास सव्वा महिन्यांनी उशिरा सुरू झाला आहे. आठवड्यातील बुधवार व शुक्रवार या दोन दिवशी ही लॉचद्वारे आरोग्य सेवा सुरू राहणार आहे.लॉंचची दुरुस्तीसह बॅटरीची कामे करून सोमवारी ट्रायल घेण्यात आली. मंगळवारी प्रत्यक्षात आरोग्य सेवा सुरू केली.

या दवाखान्याची सुरुवात भुतोंडेहून झाली असून पुढे कुंबळे, बोपे, वाघमाची, सांगवी वे.खो., डेरे या गावातील एकूण ५३ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यावेळी भुतोंडे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल कानोडजे, लॉंच चालक राजेंद्र कंक, फार्मसिस्ट हर्षद कारकुड, परिचार कृष्णा किंद्रे यांनी या तरगंत्या दवाखान्यातून सेवा पुरवली.

या भागात सद्यस्थितीला भात काढणी सुरू असल्याने नागरिक कामात व्यस्त असल्याने ओपीडीसाठी संख्या कमी होती. सांगवी वे.खो. येथील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. आठवड्यातील बुधवार व शुक्रवार या दोन दिवशी ही लाँच उपलब्ध राहणार आहे. शुक्रवार पासून ठरलेल्या वेळेत सेवा देण्यात येणार आहे. बुधवारी बोपे, कुंबळे, वाघमाची वाडी, घुमट, सांगवी, डेरे, भुतोंडे या गावांसाठी, तर शुक्रवारी गुहिणी, खुलशी, चांदवणे, डेरे, भांड्रवली, मळे, सुतारवाडी, नानवळे याठिकाणी आरोग्य सेवा देण्यात येणार असल्याचे डॉ. अमोल कानोडजे यांनी सांगितले.

अतिदुर्गम भागातील रुग्णांची सोय
भाटघर धरण अतिदुर्गम परिसरातील नागरिकांना उपचारासाठी बाहेरगावी किंवा मोठ्या शहरांमध्ये जाणे शक्य होत नसल्याने पंचायत समिती आरोग्य विभागाकडून दरवर्षी आक्टोंबर महिन्यात तरंगता दवाखान्यातून (लॉंचद्वारे) आरोग्य सेवा पुरवली जाते. गेल्या वर्षी २८ सप्टेंबरला ही सेवा सुरू करण्यात आली होती.

The post Bhor News : भोरच्या दुर्गम भागाचा आरोग्यदूत! भाटघर धरणग्रस्तांसाठी ‘पाण्यावरचा दवाखाना’ पुन्हा सुरू appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!