Bajaj Auto’s profit: बजाज ऑटोचा नफा तब्बल 53% ने वाढला; निर्यातीने खेचली गाडी

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली  – बजाज ऑटो कंपनीने शुक्रवारी दुसर्‍या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदानुसार कंपनीचा दुसर्‍या तिमाहितील करा नंतरचा नफा 53 टक्क्यांनी वाढून 2,122 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 1,385 कोटी रुपयाचा नफा झाला होता.

निर्यात वाढविण्यात कंपनीला या यश मिळाल्यामुळे कंपनीचा नफा वाढण्यात मदत झाली असल्याचे कंपनीने जाहीर केलेल्या ताळेबंदावरून दिसू नये येथे. या तिमाहीत कंपनीचा महसूल वाढून 15,735 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 13,247 कोटी रुपये होती.

सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीची वाहनांची विक्री सहा टक्क्यांनी वाढून 12,94,120 युनिट एवढी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या केवळ 12,21,504 युनिट होती. या तिमाहीत कंपनीची देशांतर्गत विक्री पाच टक्क्यांनी कमी होऊन 7,40,793 युनिट झाली आहे.
मात्र याच तिमाहीत कंपनीची निर्यात तब्बल 24 टक्क्यांनी वाढून 7,40,793 युनिटी इतकी झाली आहे. कंपनीच्या वाहनांना आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे कंपनीच्या निर्यातीत वाढ होण्यास मदत होत आहे.

आगामी काळातही कंपनी निर्यात वाढविण्याबाबत उपाययोजना करणार असल्याचे सांगितले जाते. वाहनावरील जीएसटी कमी झाल्यामुळे बजाज ऑटोबरोबरच इतर कंपन्यांची वाहनांची विक्री वाढण्यात मदत मिळत आहे. त्यामुळे तिसर्‍या तिमाहीत इतर कंपन्याही चांगले ताळेबंद जाहीर करण्याची शक्यता आहे.

The post Bajaj Auto’s profit: बजाज ऑटोचा नफा तब्बल 53% ने वाढला; निर्यातीने खेचली गाडी appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!