Asim Munir : मुनीरने मागितले $10 हजार, इस्त्रायलकडून- $100; पाकिस्तानी आर्मीचा होतोय लिलाव?

Asim Munir : मुनीरने मागितले $10 हजार, इस्त्रायलकडून- $100; पाकिस्तानी आर्मीचा होतोय लिलाव?
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Asim Munir Pakistan : काय पाकिस्तानच्या लष्कराचा लिलाव होणार आहे? गेल्या काही दिवसांपासून जागतिक मंचावरील अनेक माध्यमांमध्ये याविषयी चर्चा होत आहे. तर पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सुद्धा हा मुद्दा तापला आहे. पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल असीम मुनीर हे त्यांच्या लष्कराचा सौदा करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांनी एका सैनिकाचा लिलाव 10 हजार डॉलरमध्ये केल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे इस्त्रायलच्या बाजूने हा सौदा 100 डॉलर प्रति सैनिक असल्याचे सांगण्यात येत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

गाझा शांतता करार काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा शांतता करारावर इस्त्रायल आणि हमास या दोघांना तयार केले होते. या करारातंर्गत एक विशेष लष्कर तयार करण्यात येत आहे. हे लष्कर संपूर्ण गाझा पट्टीत तैनात असेल. या लष्करात पाकिस्तानचे सैनिकही असतील. त्यासाठी हा संपूर्ण सौदा होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या सौदेबाजीचा, या व्यवहाराचा खुलासा पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार आस्मा शिराजी यांनी केला आहे. त्यांनी नुकतीच X वर एक पोस्ट लिहिली. त्यात दावा केला आहे की, असीम मुनीर पाकिस्तानी सैनिकांचा सौदा करत आहे. त्यातून मुनीरला ही फायदा होणार असल्याचा दावा सोशल मीडियातून करण्यात येत आहे. अनेक उद्योगांचा, कंपन्यांचा ताबा असणारे पाकिस्तानी लष्कर जगात एकमेव आहे. माचिसच्या काडीपासून ते क्षेपणास्त्रापर्यंत, इंधन पुरवठ्यापासून ते निर्यातीपर्यंत अनेक क्षेत्रातील कंपन्या या लष्करी अधिकाऱ्यांच्या आणि लष्कराशीसंबंधीत लोकांच्या आहेत.

हे प्रकरण तरी काय?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा पीस प्लॅनमध्ये एक तात्पुरते लष्कर तैनात करण्यात येणार आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्टॅब्लायझेशन फोर्स (ISF) असे नाव देण्यात आले आहे. हे सैन्य दल गाझात गस्त घालण्यापासून शांतता टिकवण्यासाठी मदत करेल. हे लष्कर पॅलेस्टाईन पोलिसांना लष्कराचे प्रशिक्षण देईल. याशिवाय ही फौज इस्त्रायल आणि इजिप्त यांच्यासह सहयोगाने या पट्ट्यात काम करेल. सीमावर्ती भागात कायम शांतता नांदावी यासाठी ही फौज काम करेल. ही फौज गाझा पट्ट्यातील दहशतवादी आणि कट्टरतावाद्यांना अटकाव करेल. त्यांचा बिमोड करेल. त्यामुळे इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये वाद होणार नाही, याची काळजी घेईल.

या शांतता योजनेतंर्गत जी फौज तैनात करण्यात येणार आहे. त्यात अमेरिकन सैनिक नसतील. या लष्करात अरब देशांचे सैनिक असतील. पाकिस्तानचे सैनिकही या फौजेचा भाग असतील. एका माहितीनुसार, गाझा पट्ट्यात पाकिस्तानचे 20 हजार सैनिक तैनात करण्यात येतील. त्यासाठी रेटकार्डही तयार करण्यात आले आहे. आस्मा शिराजी यांनी खुलासा केला आहे की फिल्ड मार्शलपदी नव्याने नियुक्ती झाल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी इजिप्तचा दौरा केला होता. तिथे त्यांनी इस्त्रायल आणि अमेरिकेच्या गुप्तहेर खात्यातील वरिष्ठांशी भेट घेतली. तिथे बैठकही झाली आणि या गुप्त बैठकीत पाक लष्करातील सैनिकांची सौदेबाजी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!