
Asian Archery Championships 2025 Updates : आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय तिरंदाज अंकिता भकतने पॅरिस ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या नाम सु-ह्यॉनला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले, तर धीरज बोम्मदेवराने पुरुषांच्या रिकर्व्ह स्पर्धेत देशबांधव राहुलला पराभवाचा धक्का देत सुवर्णपदकावर मोहर उमटवली. पॅरिस ऑलिंपिकमध्ये मिश्र सांघिक रिकर्व्ह स्पर्धेत धीरज-अंकिता या जोडीने एकत्रितपणे चौथे स्थान पटकावले होते, ही ऑलिंपिकमध्ये तिरंदाजीतील भारताची सर्वोत्तम कामगिरी होती.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताने रिकर्व्ह तिरंदाजीत पाच पदके जिंकली, ज्यात चार वैयक्तिक पदके आणि पुरुष सांघिक पदक यांचा समावेश आहे. अंकिता आणि धीरजच्या सुवर्णपदकाबरोबरच राहुलने पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले, तर संगीताने महिलांच्या वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. महिलांच्या रिकर्व्ह अंतिम फेरीत, अंकिता भकतने पॅरिस ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या नाम सु-ह्यॉनचा ७-३ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
संगीताने कांस्यपदक जिंकले –
यापूर्वी, अंकिताने दक्षिण कोरियाच्या अव्वल मानांकित जंग मिनहीला पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता, उपांत्य फेरीत तिने चार वेळा ऑलिंपियन दीपिका कुमारीला शूट-ऑफमध्ये हरवले. संगीताने दुसऱ्या शूट-ऑफमध्ये दीपिकाला पराभूत करून कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह फायनलमध्ये, धीरज बोम्मदेवराने आपल्याच देशाच्या राहुलचा ६-२ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
हेही वाचा – IND A vs UAE : वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने वेधलं लक्ष! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकलं वादळी शतक
१० पदकांसह पदक तालिकेत पटकावलं अव्वलस्थान –
भारत ने #AsianArcheryChampionships 2025 में ऐतिहासिक दिन दर्ज किया।
ने रिकर्व वर्ग में दो प्रतिष्ठित व्यक्तिगत स्वर्ण पदक जीतने के साथ-साथ टीम स्वर्ण भी हासिल किया, जिससे एशियाई तीरंदाजी में एक उभरती शक्तिराष्ट्र के रूप में अपनी स्थिति और मजबूत की। pic.twitter.com/CH58fvuIpO
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) November 14, 2025
पुरुषांच्या सांघिक फायनलमध्ये ऑलिंपियन अतानु दासने राहुल आणि यशदीप भोगेसह दक्षिण कोरियाच्या सेओ मिंगी, किम येचान आणि जंग जिहो यांना शूट-ऑफमध्ये पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, मिश्र सांघिक कांस्यपदक सामन्यात अंशिका कुमारी आणि यशदीप संजय भोगे यांचा दक्षिण कोरियाच्या जंग मिनही आणि सेओ मिंगी यांच्याकडून ६-० असा पराभव झाला. या स्पर्धेत भारताने ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्यपदकांसह १० पदकांसह पदक तालिकेत अव्वलस्थानी आपली मोहीम संपवली.
हेही वाचा – PAK vs SL : बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानमध्ये दहशत! श्रीलंकेच्या संघाला पंतप्रधानांसारखी सुरक्षा, VIDEO व्हायरल
आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारतीय पदक विजेते –
- ज्योती सुरेखा वेन्नम (महिला कंपाउंड) – सुवर्णपदक
- धीरज बोम्मदेवरा (पुरुष रिकर्व्ह) – सुवर्णपदक
- अंकिता भकत (महिला रिकर्व्ह) – सुवर्णपदक
- अतनु दास, राहुल, यशदीप भोगे (पुरुष रिकर्व्ह संघ) – सुवर्णपदक
- अभिषेक वर्मा, दीपशिखा (मिश्र संघ) – सुवर्णपदक
- ज्योती सुरेखा वेन्नम, प्रितिका प्रदीप, दीपशिखा (महिला कंपाउंड संघ) – सुवर्णपदक
- राहुल (पुरुष रिकर्व्ह) – रौप्य पदक
- प्रितिका प्रदीप (महिला कंपाउंड) – रौप्य पदक
- अभिषेक वर्मा, साहिल जाधव, आणि प्रथमेश फुगे (पुरुष कंपाउंड संघ) – रौप्य पदक
- संगीता (महिला रिकर्व्ह) – कांस्यपदक
The post Asian Archery Championships : भारत आशियाई तिरंदाजी स्पर्धेचा ठरला बादशहा! १० पदकांसह पटकावले अव्वल स्थान appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.

भारत ने
ने रिकर्व वर्ग में दो प्रतिष्ठित व्यक्तिगत स्वर्ण पदक जीतने के साथ-साथ टीम स्वर्ण भी हासिल किया, जिससे एशियाई तीरंदाजी में एक उभरती शक्तिराष्ट्र के रूप में अपनी स्थिति और मजबूत की। 









